शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

दहाव्या दिवशी आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:44 PM

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचा-यांनी अकरा महिण्यांचे पूनर्नियुक्ती आदेश, समान काम, समान वेतन व विविध न्यायीक मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून सुरू केलेले सुरू कामबंद आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचा-यांनी अकरा महिण्यांचे पूनर्नियुक्ती आदेश, समान काम, समान वेतन व विविध न्यायीक मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून सुरू केलेले सुरू कामबंद आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच आहे.जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी भेट दिली. न्यायीक मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलनाला विविध संघटना व अधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे. उदया शनिवारला राज्यस्तरावर आरोग्य कर्मचा-यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.विविध मागण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र जिल्हा शाखा भंडारा यांनी, ११ एप्रिल पासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाभरातील नर्सपासून तर वैदयकीय अधिका-यांपर्यंत अधिकारी-कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. अनेक अधिकारी -पदाधिकारी यांनी आंदोलनाला भेट देत पाठिंबा दिला आहे. शुक्रवारला महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघ भंडारा यांनी, आंदोलनाला भेट दिली व पाठिंबा जाहिर केला. गुरूवारला आमदार रामचंद्र अवसरे यांनी, आंदोलनाला भेट दिली. आरोग्य कर्मचा-यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यां विस्तृतपणे जाणून घेतल्या. यावेळी सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे संदर्भ देत शासनाने समान काम समान वेतनाची मागणी यावेळी केली. याप्रसंगी आमदार अवसरे यांनी, ज्या मागण्यांसाठी जिल्हाभरातील आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्या रास्त मागण्यां शासनाने तत्काळ सोडवाव्या याकरिता लक्ष घालणार असल्याचे त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना, जिल्हा संघटनेनेच्या वतीने न्यायीक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रशासना तर्फे आरोग्य कर्मचा-यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याचे अभिवचन मा. जिल्हाधिका-यांनी दिले. सोईओ मनोजकुमार सुर्यवंशी यांनी, आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आरोग्य सेवतील कर्मचा-यांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शासन याकडे गांभियार्ने लक्ष घालत नसल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.मागील दहा दिवसापासून सुरू असलेल्या कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाची दखल जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने काल गुरूवारला घेतली. समितीचे अध्यक्ष आरोग्य समितीचे सभापती प्रेम वनवे, सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर व अन्य सदस्यांनी आंदोलनाला भेट देवून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.