शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
3
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
4
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
5
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
6
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
7
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
8
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
9
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
10
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
11
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
12
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
13
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
14
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
15
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
16
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
17
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
18
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
19
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
20
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका

Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:44 IST

Yogini Ekadashi 2025 Vrat Benefits: २२ जून रोजी योगिनी एकादशी आहे. हे व्रत केल्यामुळे दु:ख, दैन्य दूर होऊन व्यक्ती पापमुक्त होते असे शास्त्रात म्हटले आहे; त्याविषयी सविस्तर माहिती!

एका महिन्यात २ एकादशी असतात, म्हणजेच तुम्हाला एकादशीला महिन्यातून फक्त २ वेळा व वर्षाच्या ३६५ दिवसांत २४ वेळा उपवास करावा लागतो. अधिक मास आला तर त्या वर्षी २ एकादशी जोडल्या जातात आणि त्या २६ होतात. दर महिन्यात येणाऱ्या एकादशीचे वैशिष्ट्य आहे आणि वेगवेगळे नावसुद्धा आहे. ज्येष्ठ महिन्यात निर्जला आणि योगिनी एकादशी येते. पैकी निर्जला एकादशी झाली आणि २२ जून २०२५  रोजी योगिनी एकादशी(Yogini Ekadashi 2025) आहे. एकादशी व्रताचे फायदे आपल्याला माहीत आहेच, योगिनी एकादशीचे महत्त्व, कथा आणि हे व्रत केल्याने होणारे फायदेही जाणून घेऊया. 

Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!

१. योगिनी एकादशी सर्व पापं दूर करते आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीला कौटुंबिक आनंद देते. 

२. या व्रतामुळे सर्व प्रकारचा उपद्रव नाहीसा होतो आणि आयुष्यात आनंद मिळतो. 

३. योगिनी एकादशी व्रत केल्यास समृद्धी प्राप्त होते.

४. असे मानले जाते की हे व्रत केल्याने हजार ब्राह्मणांना अन्नदान केल्यासारखे पुण्य मिळते.

५. हे व्रत केल्याने सर्व प्रकारचे यश मिळते.

६. असे म्हणतात की या व्रताच्या परिणामामुळे, एखाद्याकडून मिळालेल्या शापातून मुक्तता मिळते. 

७. ही एकादशी सर्व रोग आणि आजारांचा नाश करते आणि असे म्हटले जाते की सुंदर स्वरूप, गुण आणि प्रसिद्धी मिळते.

Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!

योगिनी एकादशी व्रताची कथा:

अलकापुरीचा राजा यक्षराज कुबेर याच्याकडे हेम नावाचा एक माळी काम करायचा. त्या माळीचे काम म्हणजे दररोज भगवान शिवाची पूजा करणे, मानसरोवरहून फुले आणणे. एके दिवशी तो आपल्या पत्नीबरोबर फिरायला गेलेला असल्यामुळे त्याला फुलं घ्यायला उशीर झाला होता. तो उशीरा कुबेरांच्या सभेला पोहोचला. यामुळे रागावलेल्या कुबेराने त्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला.

शापाच्या परिणामामुळे हेम माळी इकडे-तिकडे भटकत राहिले आणि भटकत असताना मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचले. योगाच्या सामर्थ्याने ऋषींनी त्याच्या दु: खाचे कारण जाणून घेतले. व त्याला सांगितले की जर तुम्ही योगिनी एकादशीचे व्रत केले तर तुम्हाला शापातून मुक्तता मिळेल. माळीने योगिनी एकादशीचे व्रत विधिवत पाळले आणि व्रताच्या परिणामी हेम माळीचा कुष्ठरोग संपला.

जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

व्रत विधी : या व्रताच्या दिवशी इतर एकादशीच्या व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून भगवान विष्णूंची उपासना करावी. त्यांना तुळस व कमळ वाहावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूंना नमस्कार करून व्रत पूर्ण करावे आणि उपास सोडावा. शक्य असल्यास यथाशक्ती दानधर्म करावा, त्याने एकादशीचे पुण्य दुप्पटीने मिळते. 

असे हे व्रत सर्वांचे दुःख, दैन्य, दारिद्रय  दूर करणारे ठरो अशी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करूया. 

टॅग्स :ekadashiएकादशीPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणspiritualअध्यात्मिक