शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आजचा क्षण साजरा करायला कोणतं औचित्य कशाला हवं? वाचा ही सुंदर गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 08:00 IST

आपण जगतोय, सुस्थितीत जगतोय, आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होत आहेत, आपल्यावर प्रेम करणारी माणसं सभोवती आहेत, दोन वेळच्या जेवणाची आणि पुरेशी झोप घेण्यासाठी निवाऱ्याची सोय आहे, आयुष्याचे सेलिब्रेशन करायला आणि काय हवं?

तुम्ही आम्ही सगळेच, आयुष्यात योग्य क्षणाची वाट बघण्यात वेळ वाया घालवतो. परंतु अशी वाट बघण्यात कितीतरी क्षण आपण गमावून बसतो. योग्य क्षण ही संकल्पनाच चुकीची आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. क्षण क्षणात निघून जाणारा आहे. गेलेला क्षण परत आणता येणार नाही. मग तो गेल्यानंतर त्याबद्दल शोक करत राहण्यापेक्षा आजच्या क्षणावर स्वार व्हा. पुढचं पुढे...

एक साधु एका नदीच्या काठावर बसले होते. नदी दुथडी भरून वाहत होती. तिथून जाणारे येणारे वाटसरू साधुंना म्हणाले, महाराज इथे का बसला आहात? कोणाची वाट बघताय का?

साधू म्हणाले, 'हो, मला नदीच्या पलीकडच्या तीरावर जायचे आहे.'लोक म्हणाले, 'तुमच्यासाठी सुरक्षित नावेची व्यवस्था करू का?'साधू म्हणाले, 'तुम्ही नका त्रास करून घेऊ. नदीचे पाणी वाहून गेले, की मी चालत पलीकडे जाईन.'त्यांच्या बोलण्यावर आश्चर्य व्यक्त करत लोक म्हणाले, 'हे कसे शक्य आहे महाराज? नदीचे पाणी संपणारे नाही, ते वाहतच राहणार. आपण त्यातून मार्ग काढायचा.'

साधू म्हणतात, 'हेच तर मी तुम्हाला नेहमी म्हणतो. आपले सांसारिक प्रश्न, जबाबदाऱ्या, संकटं दुथडी भरून वाहणाऱ्या नदीसारखी आहेत. कधीही न संपणारी आणि कधीही न थांबणारी! म्हणून आपण ती संपण्याची वाट बघत बसायचे का? तर नाही, सुरक्षित नौका आणि कुशल नावाडी घेऊन आपली मार्गक्रमणा करत राहायची!'

साधू महाराजांनी आपल्या कृतीतून आयुष्याचे सार गावकऱ्यांना पटवून दिले. गावकऱ्यांप्रमाणे आपणही या छोट्याशा गोष्टीतून बोध घ्यायला हवा. आयुष्यातून कठीण प्रसंग जातील, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील, मग मी माझे आयुष्य जगेन, असे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. भविष्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. अगदी उद्याची सकाळ किंवा पुढच्या क्षणाचा श्वास आपण घेऊ शकू की नाही, हे आपण सांगू शकत नाही. मग भविष्यावर आपल्या सुखाचे इमले बांधण्यापेक्षा आतापासून एक एक वीट रचायला सुरुवात करा. 

आजचा क्षण आपला आहे. तो साजरा करा. आपले सण, उत्सव, परंपरा यासाठीच आहेत. भूतकाळ विसरून आनंदाने पुढचा क्षण साजरा करण्यासाठी! आज काय तर होळी, उद्या गुढीपाडवा, परवा रामनवमी, हे सण वार आनंदाचे औचित्य देतात. परंतु, याशिवायही आयुष्याचा उत्सव साजरा करायला निमित्त लागण्याची गरजच काय? आपण जगतोय, सुस्थितीत जगतोय, आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होत आहेत, आपल्यावर प्रेम करणारी माणसं सभोवती आहेत, दोन वेळच्या जेवणाची आणि पुरेशी झोप घेण्यासाठी निवाऱ्याची सोय आहे, आयुष्याचे सेलिब्रेशन करायला आणि काय हवं?