खाद्यपदार्थात असो नाहीतर धर्मकार्यात 'साजूक तुपाला' एवढे महत्त्व का? कोणत्या चुका टाळाव्यात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 08:00 AM2023-03-20T08:00:00+5:302023-03-20T08:00:02+5:30

गुढीपाडव्यापासून व्रत वैकल्यांची सुरुवात होणार, अशात नैवेद्य तसेच होमासाठी तेल, तूप कोणते वापरावे आणि कोणते नाही ते जाणून घ्या!

Why is 'Pure Ghee' so important whether in food or in religious work? What mistakes should be avoided? Read on! | खाद्यपदार्थात असो नाहीतर धर्मकार्यात 'साजूक तुपाला' एवढे महत्त्व का? कोणत्या चुका टाळाव्यात? वाचा!

खाद्यपदार्थात असो नाहीतर धर्मकार्यात 'साजूक तुपाला' एवढे महत्त्व का? कोणत्या चुका टाळाव्यात? वाचा!

googlenewsNext

वास्तविक नुसत्या देवकार्यातून व पितृकार्यातून घट्ट वनस्पती तुपाचा निषेध मानला गेला आहे असे नव्हे तर हा निषेध सर्वकालीन आहे. वास्तव अर्थाने घट्ट वनस्पती तेलापासून तयार करण्यात येणारा पदार्थ 'तूप' या नावाला कदापिही पात्र होऊ शकत नाही. त्याची निषिद्धता केवळ धार्मिक दृष्ट्याच आहे असे नाही. कारण धर्मात जे जे निषिद्ध मानले गेलेले असते, ते बहुतेक वैज्ञानिक व वैद्यकीय दृष्ट्याही निषिद्ध असतेच. 

घट्ट वनस्पती तुपाचा पहिला गुणधर्म म्हणजे त्यावर एका विशिष्ट वायूची प्रक्रिया करून ते घट्ट बनवण्यात आलेली असते. त्याचे द्रवात रुपांतर होण्यासाठी सामान्यत: १०८ फॅरनहॅट इतकी उष्णता लागते. माणसाचा जास्तीत जास्त ताप १०५ ते १०६ पर्यंत जाऊ शकेल. पण १०८ पर्यंत कधीच जाऊ शकत नाही. म्हणजे घट्ट वनस्पती तूप वितळवून द्रवरूपात आणले व ते पोटात गेले तरी पुन्हा थोडेफार घन अवस्थेत जाते असे सिद्ध होते आणि हा घन अवस्थेतील पदार्थ आतड्याच्या आतील सुरकुत्यांवर साचून त्याचा खडबडीतपणा कमी होते व पचनक्रिया मंदावते. म्हणून असे तूप खाणाऱ्या व्यक्तींना अग्निमांद्य विकाराला बळी पडावे लागते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पदार्थ नुसत्या शुद्ध शेंगतेलापासून केल्यास त्यावर वायुप्रक्रिया तितकीशी परिणामकारकरित्या होऊ शकत नाही. म्हणून त्यात प्राण्यांची चरबी मिसळावी लागते. अर्थात या चरबीतील अशुद्धांश पूर्णपणे काढलेला असतो. घट्ट वनस्पती तूपासाठी गायीच्या चरबीइतका सुयोग्य पदार्थ कोणताही नाही. म्हणजे पर्यायाने घट्ट वनस्पती तूप म्हणजे तेल आणि चरबी यांचे मिश्रण होय. देव पितृ कार्यालाच नव्हे तर कोणत्याही कार्याला चरबीयुक्त पदार्थ निषिद्ध होणे अपरिहार्य ठरते. 

तिसरी गोष्ट म्हणजे हे घट्ट वनस्पती तूप साजूक तुपापेक्षा स्वस्त म्हणून त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. पण प्रयोगांती असे सिद्ध झाले आहे की, एकाच आकाराच्या पुऱ्या साजूक तुपात शंभर होत असतील तर घट्ट वनस्पती तुपात फक्त ऐंशी होतात. म्हणून तळप माध्यम म्हणूनही त्याचा उपयोग करताना स्वस्ताईचा निकष लावता येत नाही.. 

चौथी गोष्ट म्हणजे परदेशीय शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, हृदयरोगाच्या विविध प्रकारांपैकी एक प्रकार असा आहे, की हृदयाकडे येणाऱ्या रक्तवाहिन्यात एखादा घट्ट कण अडकून बसतो व रक्तपुरवठा बंद पडतो. हा कण वायुप्रक्रिया केलेल्या चरबीतून जाण्याची शक्यता अधिक असते. 
याखेरीज काही संशोधकांना उंदरावर प्रयोग करता असेही आढळून आले आहे, की उंदराच्या सलग पिढ्यांना घट्ट वनस्पती तूप खाऊ घातले असता, जवळपास सातवी पिढी दृष्टीबधीर होते. 

अशा अनेक कारणांनी त्याज्य ठरलेले घट्ट वनस्पती तूप धर्मशास्त्रात निषिद्ध मानले तर त्यात नवल नाही. घट्ट वनस्पती तूप खाण्यात आणि होमातही वापरू नये. त्याऐवजी दोनदा गाळून स्वच्छ केलेल शेंगदाण्याचे, करडईचे तेल वापरावे. 

Web Title: Why is 'Pure Ghee' so important whether in food or in religious work? What mistakes should be avoided? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.