कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:10 IST2025-11-13T15:09:41+5:302025-11-13T15:10:31+5:30
'देवाची अनंत रुपे आहेत, पण त्यापैकी कोणत्या देवाची उपासना अधिक फलदायी ठरते?' भाविकांच्या या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर.

कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
देव एक आहे, त्याची रूपे अनंत आहेत. 'जया जैसा भाव, तया तैसा अनुभव' असे संत म्हणतात, ते उगीच नाही! ज्याच्या मनात जसा भाव असेल तसा त्याला देव दिसतो. त्याच्यावर आपली दृढ श्रद्धा हवी. आपल्या इच्छेनुसार देवांची निवड करणे योग्य नाही असे प्रेमानंद महाराज सांगतात. हे पटवून देताना त्यांनी एक चपखल उदाहरण दिले आहे.
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना
ते सांगतात, 'एखादा कुत्रा रोज एखाद्या मंदिराच्या दाराशी येत असेल तर एक दिवस तो उपाशी राहील, कोणी त्याच्याकडे लक्ष देणार नाही, दुसऱ्या दिवशीही कदाचित तसे होईल. किंवा आणखीही अनेक दिवस लागतील. पण ज्या दिवशी तो कुत्रा तिथे दिसणार नाही, तेव्हा त्याच्या नसण्याने लोकांची नजर त्याचा शोध घेईल. अशातच तो दुसऱ्या एखाद्या मंदिराजवळ दिसला, तर लोक म्हणतील याला एका नाहीतर दुसऱ्या मंदिराजवळ बसून निश्चितपणे काहीतरी मिळत असणार. आपण काही दिले नाही तर चालेल.
हाच विचार दुसऱ्या मंदिराजवळील लोक करू लागले तर तो तिथेही उपाशी राहील. तिसऱ्या मंदिरात लोकांना त्याच्या येण्याची सवय होईपर्यंत आणखी काही दिवस जातील आणि त्यांनाही हा इतर मंदिरात आढळला तर त्याला खायला घालणे बंद करतील. ज्यामुळे त्याची आणखीनच उपासमार होईल.
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
म्हणजेच एका ठिकाणी न जाता सगळीकडे गेल्यामुळे हाती काहीच लागणार नाही. जी बाब त्याची तीच आपली. सगळ्या देवांना वेठीस धरण्यापेक्षा कोणत्याही एका देवाची उपासना करा, सगळी सुखं प्राप्त होतील. ऐहिक आणि पारमार्थिक सुद्धा! मग तुम्ही राधे राधे म्हणा नाहीतर राम राम! जे नाव घ्याल ते श्रद्धेने घ्या. समर्पित भावनेने घ्या. तुमचे मनोरथ पूर्ण होईल.
पाहा महाराजांचा व्हिडीओ -