शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

समाधानाची नेमकी व्याख्या काय, ते कुठे मिळते? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 08:00 IST

कोणी आपल्याला चांगले म्हणावे, कोणी आभार मानावेत, ही भावना ठेवून केलेली मदत कधीच समाधान देऊ शकत नाही.

एका बिल्डिंगच्या बांधकामाच्या ठिकाणी एक मजूर अगदी प्रामाणिकपणे काम करत असे. त्याच्या चेहेऱ्यावर कायम मंद स्मित असे. त्याला पाहून ठेकेदाराला फार बरे वाटे. परंतु त्याच वेळेस मनात येई, की याला काही अडचणी येत नसतील का? याच्या चेहऱ्यावर एवढे समाधान कसे? अशा विचारात तो ठेकेदार त्याची परीक्षा घ्यावी असे ठरवतो. 

एक दिवस तो कामात असताना त्याचा जेवणाचा डबा ठेकेदार लपवून ठेवतो. जेवणाची सुटी होते. तो आपला डबा शोधतो, पण त्याला तो मिळत नाही. तेव्हा त्याचे सहकारी सांगतात, 'काळजी करू नकोस आमच्यातले जेवण घे आपण मिळून जेवू.' क्षणापुर्वीचा त्याचा चिंतीत झालेला चेहरा पुन्हा समाधानाने उजळतो आणि त्याला जेवण देणाऱ्या सहकाऱ्याचा चेहरा आनंदाने उजळतो. ठेकेदार आणखी एक परीक्षा घेतो. एक दिवस तो जेवणाच्या डब्याच्या पिशवीत दोनशे रुपये ठेवतो.

जेवणाची सुटी होते. त्याच्या हाती पैसे लागतात. गेल्या वेळेस जेवण देणाऱ्या सहकाऱ्याच्या आजारी बायकोला औषधाची गरज असते. मागचा पुढचा विचार न करता तो ते पैसे मित्राला देऊन टाकतो. आता त्याचा चेहरा आनंदाने तर मित्राचा चेहरा समाधानाने उजळतो. ठेकेदाराला बोध मिळतो. 

समाधान, आनंद हा घेण्यात नाही तर देण्यात आहे. तेही निरिच्छ मनाने! कोणी आपल्याला चांगले म्हणावे, कोणी आभार मानावेत, ही भावना ठेवून केलेली मदत कधीच समाधान देऊ शकत नाही. समोरच्याने आभार मानले तर अहंकाराला खतपाणी घालते जाते आणि आभार मानले नाही तर क्रोधाला हातभार लागतो. म्हणून निष्काम मनाने मदत करावी आणि परोपकाराचा भाव विसरून जावा . देव दयेने सगळे मिळत आहे, हे लक्षात घेऊन त्याचे आभार मानावे, यातच खरे समाधान आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी