शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
3
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
4
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
5
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
6
Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?
7
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
8
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
9
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
10
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
11
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
13
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
14
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
15
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
16
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
17
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
18
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
19
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
20
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्या प्रकारच्या दु:खाचे कारण काय? भगवान बुद्ध सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 12:59 IST

या छोट्याशा गोष्टीतून दुःखाचे मूळ आणि त्यावर उपाय दोन्ही जाणून घ्या!

आजच्या काळात ज्याला बघावे तो आपापल्या दु:खात अडकलेला आहे. परंतु दु:खाचे मूळ काय याचा आपण कधी विचारच करत नाही. हाच प्रश्न उपस्थित केला भगवान बुद्धांच्या शिष्याने...

एकदा भगवान बुद्धांना त्यांच्या शिष्याने विचारले, `भगवान दु:खाचे मूळ कारण काय?'भगवान म्हणाले, 'एक गोष्ट सांगतो म्हणजे तुला दु:खाचे कारण आपोआप कळेल.' भगवान बुद्ध गोष्ट सांगू लागले...एका गावात एक व्यापारी होता. तो अतिशय श्रीमंत होता. त्याने एकदा बाहेर गावाहून एक छान शोभेची वस्तू विकत आणली. घरी आल्यावर आपल्या प्रामाणिक नोकराच्या हाती वस्तू सोपवून म्हणाला, `ही शोभेची वस्तू अतिशय महाग आहे, हलक्या हातांनी कपाटात नेऊन ठेव.'

नोकराने जबाबदारीने वस्तू हातात घेतली आणि सांभाळून ती वस्तू कपाटात ठेवणार, तोच हातातून निसटून ती खाली पडली आणि फुटली. नोकर थरथर कापू लागला. व्यापारी रागाने लालेलाल झाला. त्याक्षणी नोकराला नोकरीवरून काढून टाकावे, हा विचारही त्याच्या मनात डोकावला. परंतु त्याने क्षणभर विचार केला, की या एका चुकीसाठी त्याची आयुष्यभराची प्रामाणिकपणे केलेली सेवा विसरून चालणार नाही. त्याने नोकराला माफ केले. पण त्या रात्री व्यापाऱ्याला झोप लागली नाही. त्याने बाहेर येऊन पाहिले तर नोकर घोरत झोपला होता. व्यापाऱ्याला राग आला, एवढी महागडी वस्तू फुटली याचे शल्य न बाळगता, हा खुशाल झोपलाय. 

दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने नोकराला सांगितले, `काल तुझ्या हातून जी महागडी वस्तू फुटली, ती मी तुला भेट देण्यासाठी आणली होती. पण ती देण्याआधीच फुटलीयाचे मला वाईट वाटले.' हे कळल्यापासून नोकर अस्वस्थ झाला. स्वत:ला, स्वत:च्या नशीबाला दोष देऊ लागला. त्या रात्री नोकराला झोप आली नाही, पण व्यापारी घोरत झोपला.

अशा रितीने गोष्ट पूर्ण करून भगवान बुद्धांनी शिष्याला विचारले, आता सांग दु:खाचे मूळ कारण काय?शिष्य म्हणाला, 'भगवान, विचार हेच दु:खाचे मूळ कारण आहे.'भगवान म्हणाले, 'अगदी बरोबर! या जगात कायमस्वरूपी काहीच नाही. जे आहे ते क्षणभंगूर आहे. हे लक्षात न घेता आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि दु:खी होतो. म्हणून अति विचार टाळणे म्हणजे दु:खाचे मूळ मिटवणे!' 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी