साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन८ ते १४ फेब्रुवारी===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा!
नंबर १:
वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात एखादा आनंदाचा प्रसंग येण्याची शक्यता आहे. सणसमारंभातून समाधान मिळेल!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात एक महत्वाचा टप्पा गाठला जाईल. पाया मजबूत होईल अशी कामगिरी होईल. सगळ्यांच्या सोबतीने काम करा!फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादा फायदा होण्याची शक्यता आहे. मिळेल त्यात आनंद मानून घ्या! रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत सकारात्मक असा काळ राहील. साखरपुडा विवाह निश्चिती किंवा प्रत्यक्ष विवाह अशा प्रकारचे महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले जाऊ शकते!शिक्षण/परीक्षा - तुमच्या केलेल्या अभ्यासाचे चांगले फळ मिळेल. त्यामुळे कष्ट पूर्ण करा, आळस नको. कोणताही किंवा शॉर्ट कट वापरू नका!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात हवे तसे घडण्याची शक्यता आहे. वाजवी किंमतीत व्यवहार होतील. फक्त जवळच्या लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या!कोर्ट कचेरी - या बाबतीत तुमच्या बाजूने कौल येण्याची शक्यता आहे. लोकांच्या गाठीभेटीतून अडकलेले प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नातेवाईक मित्रमैत्रिणी यांना नक्की भेटायला जाणे हिताचे ठरेल!आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत सुधारणा होईल. औषधांचा सकारात्मक परिणाम दिसेल. उन्हात जाताना योग्य ती काळजी घेणे चांगले!प्रवास - एखाद्या कार्यक्रमासाठी प्रवास होण्याचे योग आहेत. प्रवासात सुखद अनुभव येतील. चांगल्या लोकांची भेट होईल. योग्य ती मदत मिळेल.
नंबर २:
वैयक्तिक आयुष्य - घरात क्लेशदायक गोष्टी संभवतात. अपेक्षाभंग किंवा मनाप्रमाणे न झाल्यामुळे त्रास होऊ शकतो. संयम ठेवा!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात वरिष्ठांसमोर शरणागती पत्करावी लागेल. स्वीकार करा फार लढायला जाऊ नका!फायनान्स - आर्थिक बाबतीत हवे तेवढे यश येणार नाही त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक व्यवहार टाळा!रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एखादी घटना अशी घडेल ज्यामुळे मोठा बदल होऊ शकतो. सगळ्याच गोष्टी तुमच्या हातात नसतील हे लक्षात ठेवा!शिक्षण/परीक्षा - अती शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अनुभव येण्याची शक्यता आहे त्यामुळे जपून वागा, अती आत्मविश्वास नको!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात माघार घ्यावी लागेल. परिस्थितीचा स्वीकार करावा लागेल.कोर्ट कचेरी - या बाबतीत तुमच्या हातात काहीच नसणार, त्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून रहावा लागेल. स्वतःचा इगो बाजूला ठेवून वागा!आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे, कुपथ्य अंगाशी येऊ शकतं. अती साहस किंवा अती पराक्रम करायला जाऊ नका!प्रवास - प्रवासात शांत राहिलात तर त्रास होणार नाही. अती श्रम किंवा दगदग करु नका!
नंबर ३:
वैयक्तिक आयुष्य - घरात तुमचे वर्चस्व राहील. अधिक जबाबदारी पडेल आणि ती तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडाल. भावनेपेक्षा बुद्धीने निर्णय घ्या!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात चांगली वाटचाल होईल. पुढचे नियोजन करा. कायदेशीर गोष्टींकडे विशेष लक्ष द्या!फायनान्स - आर्थिक बाबतीत तुमची हुशारी कामास येईल. योग्य तितकाच खर्च करा. कुठल्याही आमिषाला भुलू नका!लेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला एक प्रकारचा विश्वास वाटेल. संभाषण चांगले आणि चोख ठेवले तर उत्तम प्रगती होईल!शिक्षण/परीक्षा - तुमच्या बुद्धीचा कस लागेल. बुद्धीला चालना मिळेल. आत्मविश्वास वाढेल. फक्त अती आत्मविश्वास ठेवून गर्व होऊ देऊ नका. शिक्षक किंवा मार्गदर्शक यांच्याशी वाद नको!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात तुमची चाणाक्ष बुद्धी आणि नजर तुम्हाला फायद्याची ठरेल. विचारपूर्वक निर्णय घ्या, घाईत नुकसान होऊ शकते.कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात अडकलेला प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. वकील किंवा मार्गदर्शक सल्लागार यांचे म्हणणे ऐकलेले चांगले.आरोग्य - आरोग्यात सुधारणा होईल. वातविकार किंवा कफाचे त्रास होऊ शकतात. धारदार वस्तू जपून वापरा. अती विचार करुन त्रास करुन घेऊ नका!प्रवास - प्रवास अनुकूल वातावरण राहील. अपेक्षेपेक्षा चांगला अनुभव येण्याची शक्यता आहे. वेळेत निघा आणि कागदपत्रे सांभाळा.
या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com
Web Summary : Choose 1, 2, or 3 for your weekly Tarot reading with Sumedh Ranade. Discover insights into personal life, career, finance, relationships, education, and health for the week of February 8-14. Make your choice and find out what the cards reveal!
Web Summary : सुमेध रानडे के साथ साप्ताहिक टैरो रीडिंग के लिए 1, 2, या 3 चुनें। 8-14 फरवरी के सप्ताह के लिए व्यक्तिगत जीवन, करियर, वित्त, रिश्तों, शिक्षा और स्वास्थ्य में अंतर्दृष्टि प्राप्त करें। अपनी पसंद बनाएं और जानें कि कार्ड क्या प्रकट करते हैं!