WEDDING DATES IN 2022: येत्या वर्षात लग्नाचा विचार करताय? मग हे घ्या वर्षभरातील विवाहाचे शुभ मुहूर्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 15:29 IST2021-12-10T15:24:02+5:302021-12-10T15:29:03+5:30
WEDDING DATES IN 2022 : मागील दोन वर्षात विवाह झाले पण लग्न सराईची मजा लुटता आली नाही. मात्र आगामी वर्षात आनंदाचे उधाण येईल अशी आशा करूया आणि लग्न सराईत सहभागी होऊया.

WEDDING DATES IN 2022: येत्या वर्षात लग्नाचा विचार करताय? मग हे घ्या वर्षभरातील विवाहाचे शुभ मुहूर्त!
२०२२ हे वर्ष विवाहेच्छुकांसाठी अतिशय लाभदायक आहे. कारण या वर्षभरात चातुर्मास वगळता विवाहासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. कोरोनाकाळातही अनेक लग्न झाली, परंतु भारतीय विवाहपद्धतीची धामधूम किंवा लग्न सराईतल्या आनंदाचा अभाव सर्वांना जाणवला. मात्र आगामी वर्षात तसे होणार नाही असे म्हणता येईल.चला तर जाणून घेऊया आगामी वर्षातील विवाह मुहूर्त!
जानेवारी : या महिन्याच्या २२,२३,२४ आणि २५ तारखेला लग्न करणे शुभ राहील.
फेब्रुवारी : ५,६,७,९,१०,११,१२,१९,२० आणि २२ तारखा या महिन्यात लग्नासाठी शुभ आहेत.
मार्च : या महिन्यात लग्नासाठी दोनच शुभ मुहूर्त आहेत. या महिन्याच्या ४ आणि ९ तारखेला होणारे विवाह शुभ सिद्ध होतील.
एप्रिल : या महिन्यात १४, १५, १६, १७, १९, २०, २१, २२, २३, २४ आणि २७ तारखेला लग्न करणे शुभ राहील.
मे : मे महिन्यात ९, १०,११, १२, १५, १७, १८, १९, २०, २१, २६ तारखेला लग्नासाठी शुभ मुहूर्त आहे.
जून : १, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १३, १७, २३ आणि २४ जूनला विवाह करणे शुभ राहील.
जुलै : जुलैमध्ये ४,६,७,८ आणि ९ या शुभ मुहूर्त आहेत.
नोव्हेंबर : या महिन्याच्या २५,२५, २८ आणि २९ तारखेला लग्नासाठी शुभ मुहूर्त आहे.
डिसेंबर: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात १, २, ४, ७, ८, ९ आणि १४ तारखेला शुभ मुहूर्त असेल.
चला तर मग, लागा तयारीला!