शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

Waman Jayanti 2023: वामन जयंती निमित्त माहिती घेऊया वाकाटक कालीन नागपूरस्थित वामन मंदिराची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 14:48 IST

Waman Jayanti 2023: श्री विष्णूंचे दशावतार आपल्याला माहीत आहेच पण त्या अवतरांचे दर्शन घडवणारी मंदिरं क्वचितच आढळतात, रामटेक हे त्यापैकी एक!

>> सर्वेश फडणवीस 

रामटेक येथे भगवान श्री विष्णूच्या दशावताराचे मंदिर आहे. तेथे श्रीराम, नृसिंह, वराह तसेच विष्णूंचा एक अवतार वामन अवतार आहे. वामन अवतारात श्रीविष्णूंनी बटु वामनाचे रूप घेतले व उन्मत्त बळीराजास याचक म्हणून यज्ञाच्या वेळी तीन पावलं भूमी मागितली. राजा उदार व दानी होता. तो वामनास म्हणाला, "अरे बटु, तुझी पावलं ती किती छोटी ? दिली तीन पावलं जमीन! चल घे." बटुने एका पावलात संपूर्ण पृथ्वी, दुसऱ्या पावलात अंतराळ व्यापले आणि विचारले, तिसरे पाऊल कुठे ठेवू? राजा म्हणाला, 'माझ्या मस्तकावर ठेवा बटुराज!' बळीच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवून बळी व त्याच्या अर्धांगिनीस पाताळात ढकलले. त्याच्या मस्तकावर आपले पाऊल ठेवले. ते मंदिर बटुरूप धारण करणाऱ्या वामनाचे अर्थात श्रीविष्णूंचे त्रिविक्रम रूपाचे मंदिर आहे. कथा आपण सर्वच जाणतो. यातील प्रतिमा ही वामनाची - त्रिविक्रमांची अर्थात श्रीविष्णूंची आहे. वाकटक कालीन त्रिविक्रम मंदिर बहुतांशी नष्ट झाले असले तरी त्रिविक्रमाची मूर्ती सौष्ठवयुक्त असून लक्ष वेधून घेणारी आहे.

मंदिर लाल दगडाचे असून मंडप चारही बाजूंनी उघडा आहे. या मंडपास सहा दगडी खांब असून त्यापैकी चार खांबावर पद्मबंधाचे कोरीव काम आहे. पण इतर दोन खांब मात्र साधे आहेत. मंडपाचा वरचा भाग इतर ठिकाणाच्या गुप्त-वाकाटक कालीन मंदिराप्रमाणे सपाट असून या देवालयात मुळात ही त्रिविक्रमाची प्रतिमा आहे. इतर अवताराप्रमाणे येथे त्रिविक्रमच अपेक्षित आहे. त्रिविक्रमची दगडी प्रतिमा चतुर्भुज असून शिरावर किरीट आहे. त्याच्या शिरावर मागे तेजोवलय दाखवले असून कानात कुंडल आणि गळ्यात पदकासहित मुक्तहार आहे. वैजयंतीमाला दोन्ही पायांवर लोंबती दर्शविली आहे. कमरेवर उदरबंध असून अधोवस्त्र बांधले आहे.  त्रिविक्रमांचे सर्व हात आता भग्न झालेले असून, त्यांचे रत्नजडीत अंगद अद्यापही दिसत आहे. त्रिविक्रमांचा डावा पाय मजबुतपणे रोवला असून उजवा पाय आकाश व्यापण्याकरिता उचललेला दिसतो. पण आता ते भग्न आहे. मंदिर छोटेसेच आहे. पण विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. आता आपण रामटेकला गेल्यावर गड मंदिरासोबत त्रिविक्रमाचे मंदिर ही बघायला हवे खरंतर हे आडवाटेवर आहे पण  हा वैभवशाली आणि समृद्ध करणारा इतिहास येथे बघायला मिळत आहे. संस्कृतीच्या पाऊलखुणा तिथे आजही डौलाने उभ्या आहेत. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सTempleमंदिरnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र