शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Vinayak Chaturthi 2025: आज महाराष्ट्र दिन आणि विनायक चतुर्थी; करूया महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे स्मरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 07:05 IST

Vinayak Chaturthi 2025: आज मे महिन्याची सुरुवात होत आहे विनायक चतुर्थीने, त्यानिमित्त महाराष्ट्रावर कृपावंत असलेल्या अष्टविनायकाचे स्मरण करूया!

गणपती बाप्पाचे कोणतेही रूप घ्या, ते गोडच वाटते. म्हणून तर लहान मुलांपासून कसलेल्या चित्रकारांपर्यंत सर्वांनाच त्याचे मोहक रूप चितारावेसे वाटते. गणेश देवस्थान कुठेही असो, तिथे गेल्यावर बाप्पाच्या दर्शनाने प्रसन्न वाटते. म्हणून तर त्याला मंगलमूर्ती म्हणतात. अशा या गजाननाच्या मुख्य अवतारांचे संकष्टी निमित्त स्मरण करून त्याचा अत्यंत प्रभावी मंत्र जपूया. 

अष्ट विनायक: जरी गणेशाचे अनेक अवतार झाले असले तरी आठ अवतार अधिक प्रसिद्ध आहेत, ज्यांना अष्ट विनायक म्हणतात. 

पहिला गणपती - मोरगावचा श्री मयुरेश्वरदुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वरतिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वरचौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायकपाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणीसहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मकसातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वरआठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती

सिद्धीविनायक : या अष्टविनायकांप्रमाणे सिद्धीविनायकाचे दर्शनही शुभ मानले जाते. सिद्धटेक नावाच्या पर्वतावर दिसल्यामुळे त्याला सिद्धी विनायक म्हटले जाते. सिद्धीविनायकाच्या उपासनेमुळे प्रत्येक संकट आणि अडथळ्यांपासून त्वरित सुटका मिळते. सिद्धी विनायकाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि सर्व प्रकारच्या कर्जापासून मुक्तता मिळते. याची पूजा केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते आणि संतती सुख नसलेल्यांना संतती प्राप्ती होते. असे म्हटले जाते की विश्वाच्या निर्मितीपूर्वी भगवान विष्णूंनी सिद्धटेक पर्वतावर त्यांची पूजा केली. त्यांची पूजा केल्यावरच ब्रह्मदेव कोणत्याही अडथळ्याशिवाय विश्वाची निर्मिती करू शकले. अशी सिद्धिविनायकाची ख्याती आहे. सिद्धी विनायकाचे स्वरूप चतुर्भुज असून त्यांच्या पत्नी रिद्धी सिद्धीही त्यांच्यासोबत बसल्या आहेत. सिद्धी विनायकने वरच्या हातात कमळ आणि अंकुश आणि खालच्या हातात मोत्यांची माला आणि एका हातात मोदकांनी भरलेले भांडे ठेवले आहे. 

सिद्धी विनायकाचे मंत्र:"ॐ सिद्धिविनायक नमो नमः""ॐ नमो सिद्धिविनायक सर्वकार्यकत्रयी सर्वविघ्नप्रशामण्य सर्वराज्यवश्याकारण्य सर्वज्ञानसर्व स्त्रीपुरुषाकारषण्य"

अशाप्रकारे बाप्पाचे कोणतेही मूर्त अमूर्त स्वरूप हे आनंददायीच आहे. त्याचे स्मरण करून मनापासून म्हणूया गणपती बाप्पा मोरया...!

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनAshtavinayakअष्टविनायक गणपतीvinayak chaturthiविनायक चतुर्थीMaharashtraमहाराष्ट्र