शहरं
Join us  
Trending Stories
1
मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा
2
'खेला होबे'! भाजपाचे ३ खासदार TMC च्या संपर्कात असल्याचा दावा; संख्या २३७ होणार?
3
"रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका
4
नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या आखाड्यात आता चौरंगी लढत; अजित पवार गटाची बंडखोरी कायम
5
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अर्शदीप सिंगची पहिल्याच षटकात ऐतिहासिक भरारी! अमेरिकेचे २ फलंदाज पाठवले माघारी
6
झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू
7
खिशात ठेवलेला मोबाईल वाजला, उचलण्यापूर्वीच झाला स्फोट; तरुण जखमी
8
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
9
ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ...
10
Maharashtra Politics : अजित पवार बारामतीमध्ये दीड लाख मतांनी जिंकतील; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
11
भारतापेक्षा ३ पटीनं अधिक पैसे; कुवैतमध्ये छोट्या कामासाठी मिळतो 'इतका' पगार
12
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
13
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
14
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
15
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...
16
Ration Card Aadhar Card : सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली
17
"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला
18
Maratha Reservation : "थोडं सबुरीने घ्या आणि सरकारला वेळ द्या"; मनोज जरांगे पाटलांना केंद्रीय मंत्र्यांची विनंती
19
मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास
20
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश

वास्तुशास्त्र : गृहप्रवेशाच्या वेळी दारावर स्वस्तिक का रेखाटले जाते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 8:00 AM

आपल्या संस्कृती आणि परंपरेने कायम जगदोद्धाराचाच विचार केला आहे. त्याचेच हे मंगलमयी स्वरूप `स्वस्तिक' आपणही आपल्या दारावर कुंकवाने उमटवून किंवा रांगोळीने रेखाटून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करूया.

जगात सर्व ठिकाणी स्वस्तिक चिन्ह निरनिराळ्या रुपात स्वीकारले गेले आहे. स्वस्तिक हे चिन्ह भारतीयांनी जगाला दिले. हे मंगल चिन्ह मानतात. चिरंतन सत्य, शाश्वत शांति व अनंत ऐश्वर्याचे, दिव्य सौंदर्याचे निदर्शक समजतात. जगातले सर्वप्रथम साहित्य वेद होत. त्यात स्वस्तिकाचा उल्लेख आहे. हे स्वस्तिक चिन्ह आर्यांचे आदि मांगलिक चिन्ह आहे. 

हठयोगातही एक स्वस्तिक नावाचे आसन असते. अलीकडेच समाजमाध्यमावर एका लहान मुलाने स्वस्तिकासन केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. ते आसन अतिशय अवघड असते. परंतु, शारीरिकदृष्ट्या त्याचे अनेक फायदे आहेत. लवचिक शरीर आणि  उत्तम योगाभ्यास असणाऱ्यांनाच ते आसन जमू शकते. 

मंत्रसिद्धीसाठी असणारी यंत्रे आहेत, त्यात स्वस्तिक यंत्र आहे. हस्त सामुद्रिक शास्त्रात हातापायावर स्वस्तिक चिन्ह असणे हे मंगलमय, ऐश्वर्यदर्शक मानतात. कोणत्याही मंगलकार्यात गणेशपूजा असते, त्याही आधी शुभदर्शक म्हणून स्वस्तिक चिन्हाने ते स्थळ सुशोभित करतात. जलकलशावर स्वस्तिक रेखाटतात. हे चिन्हच कलात्मवाचक आहे. केवळ वैदिकांनीच नव्हे, तर पारशी, बौद्ध, जैन इत्यादि अन्य धर्मांनीही स्वस्तिक चिन्ह स्वीकारून ते आपल्या मंदिरात, धर्मग्रंथात, वास्तूंत, नाण्यांवर, वस्तूच्या नावासाठी वापरले आहे.

धर्मशास्त्राच्या अभ्यासक सुधा धामणकर, जगभरातील स्वस्तिकाच्या वापराबद्दल विस्तृत माहिती देतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील आदिवासी माबरी जमातीचे लोक स्वस्तिक हे शुभ प्रतीक मानतात. जपानी लोक या चिन्हाला `मनजी' म्हणतात. कोरिया देशात पालख्या, छत्रचामरे इ. गोष्टींवर स्वस्तिक काढतात. चिनी माणसे हे चिन्ह तर कल्याणाचे प्रतीक समजतातच. पण दीर्घायुष्य, तेज प्रकाश, सूर्य यांचे प्रतीक मानतात. तिबेटी लोक आपल्या हातावर स्वस्तिक गोंदून घेतात. अल्जेरिया, इजिप्त, युरोप, स्कॉटलंड, आदि देशात स्वस्तिकाचा उपयोग होत आला आहे. 

स्वस्तिक शब्दाचा अर्थ:

सु+अस्ति म्हणजे चांगले, कल्याणमय, मंगल आणि अस् म्हणजे सत्ता, अस्तित्व. स्वस्ति म्हणजे कल्याणाची सत्ता, मांगल्याचे अस्तित्त्व आणि त्यांचे प्रतीक  म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक हे शांती, समृद्धी व मांगल्य यांचे प्रतीक आहे.

स्वस्तिकाच्या चिन्हात अनेक गूढ परिभाषा दडलेल्या आहेत, असे म्हणतात. गणपतीच्या `गं' या बीजाक्षरातही स्वस्तिक आहे. प्राचीन तसेच अर्वाचीन मान्यतेनुसार सूर्यमंडलाच्या चहू बाजूला विस्तारलेले विद्युत केंद्र स्वस्तिक स्वरूप आहे. वाल्मिकी रामायणातही स्वस्तिकाचा उल्लेख आहे. त्यातील उल्लेखानुसार नागाच्या फण्यावरस्थित नीळी रेघदेखील स्वस्तिकाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक हे नादब्रम्हाचे स्वरूप आहे. वैज्ञानिक परिभाषेनुसार स्वस्तिक अग्नी, जल, वायु, तेज यांनी युक्त असल्यामुळे त्याला `गतीशील सौर' म्हटले जाते. 

स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे अजोड प्रतीक आहे. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी, तसेच गृह प्रवेशाच्यावेळी एक मंत्र म्हटला जातो,

स्वस्ति न: इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति न पूषा विश्ववेदा:।स्वस्ति नस्तारक्ष्र्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु।।

महान कीर्तीवान इंद्र आमचे कल्याण करो. विश्वाचा ज्ञानस्वरूप पूषादेव आमचे कल्याण साधो. ज्याचे शस्त्र अतूट आहे असा भगवान गरुड आमचे मंगल करो. 

आपल्या संस्कृती आणि परंपरेने कायम जगदोद्धाराचाच विचार केला आहे. त्याचेच हे मंगलमयी स्वरूप `स्वस्तिक' आपणही आपल्या दारावर कुंकवाने उमटवून किंवा रांगोळीने रेखाटून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करूया.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र