Vastu Tips: स्वयंपाक घराच्या खिडकीत धने ठेवा, धनवान बना; वाचा हे खास उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 15:21 IST2022-12-13T15:21:25+5:302022-12-13T15:21:50+5:30
Vastu Tips: हळद, तिखट, मिठाइतकीच धने पावडर आपल्या आहारात नित्यनेमाने वापरली जाते, तिचा वास्तू शास्त्रात दिलेला उपयोगही करून बघा.

Vastu Tips: स्वयंपाक घराच्या खिडकीत धने ठेवा, धनवान बना; वाचा हे खास उपाय!
स्वयं[पाकघरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्याच्या उपायांमुळे घरात सकारात्मकता तर येतेच, शिवाय माणसाच्या आयुष्यात कोणतीही उणीव जाणवत नाही. त्यातलाच एक घटक म्हणजे धने अर्थात कोथिंबीरीचे बी. धने पावडर किंवा कोथिंबिरीचा आपल्या जेवणात सर्रास वापर होतोच, त्याबरोबर वास्तू शास्त्रातही त्याचा अनेक प्रकारे वापर केलेला जातो. कसा ते जाणून घेऊ.
>>तुमच्याकडून कोणी कर्ज घेतले असेल आणि ठराविक वेळेनंतरही ते पैसे परत केले नसतील तर एका कोऱ्या कागदावर त्या व्यक्तीचे नाव लिहून त्यात चमचाभर धने बांधून ती कागदाची पुडी वाहत्या पाण्यात सोडून द्या. पैसे घेणाऱ्याला पैसे परत करण्याची उपरती होईल.
>>धनप्राप्तीसाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात मातीच्या भांड्यात कोरडी कोथिंबीर ठेवा. त्यात काही नाणी टाकून उत्तरेकडे ठेवा. भांड्यात धणे वाढू लागल्यावर त्यात ठेवलेली नाणी काढून तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने धनलाभ होतो.
>>ज्या घरात वरचेवर वाद होत असतात, त्या घरात पूर्व दिशेला कोपऱ्यात कागदात धने गुंडाळलेली पुरचुंडी ठेवावी. यामुळे घरात सुख-शांती नांदेल आणि सदस्यांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतील. तसेच स्वयंपाक घराच्या पूर्व दिशेला, विशेषतः खिडकीत चमचाभर धने ठेवल्यास धन संपत्तीचा ओघ घराकडे वाढतो.
>>लाल कपड्याच्या तुकड्यात धने बांधून हनुमंताला अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर या उपायासह हनुमान चालिसाचे पठण करा. नैराश्य दूर होईल!
>>घराची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठीही धन्यांचा वापर करता येते. बुधवारी गायीला कोथिंबिरीची जुडी खायला दिल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि घराची आर्थिक स्थिती सुधारते.