Vastu Shastra: शनिवारी घरात मिठाचा 'असा' वापर केल्याने दूर होतो वास्तुदोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:06 IST2025-07-19T18:06:07+5:302025-07-19T18:06:24+5:30

Vastu Shastra: मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ति असते, पण त्याचा योग्य जागी वापर व्हायला हवा, त्यासाठी या वास्तु टिप्स!

Vastu Shastra: Using salt in the house on Saturday removes Vastu defects! | Vastu Shastra: शनिवारी घरात मिठाचा 'असा' वापर केल्याने दूर होतो वास्तुदोष!

Vastu Shastra: शनिवारी घरात मिठाचा 'असा' वापर केल्याने दूर होतो वास्तुदोष!

मीठ केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर घरातील अनेक वास्तुदोष देखील दूर करते. म्हणून वास्तुशास्त्रात मिठाचा विवीध ठिकाणी वापर करून घेतला आहे. फरशी पुसताना पाण्यात मीठ घालण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश होण्याचे ठिकाण म्हणजे टॉयलेट-बाथरूम, तिथे खडे मीठ ठेवल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊ. 

असे म्हणतात, की घराचे टॉयलेट, बाथरूम स्वच्छ असेल तर कुटुंबियांचे आरोग्य आणि त्यांची जीवनशैली कशी आहे हे कळते. म्हणून वास्तुशास्त्रानुसार ते स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच तिथून येणारी नकारात्मक ऊर्जा रोखण्याचे उपाय जाणून घेऊ. 

वास्तुशास्त्र आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून बाथरूममध्ये मीठ ठेवण्याचे महत्त्व विशेष मानले जाते. मीठ हे शुद्धतेचे घटक मानले जाते आणि ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. बाथरूम हा घराचा तो कोपरा आहे जिथे नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त जमा होते. हे घडते कारण हे ठिकाण ओलावा, घाण आणि कचऱ्याशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत, जर तिथे मीठ ठेवले तर ते नकारात्मकतेला दूर करते. तसेच, जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तिथे मीठ ठेवल्याने ते दूर होण्यास मदत होते. त्यासाठी बाथरूममध्ये मीठ ठेवण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया. 

नकारात्मक ऊर्जेचा नाश : मिठामध्ये वातावरणातील अशुद्धता आणि नकारात्मकता शोषून घेण्याची अद्भुत क्षमता असते. बाथरूममध्ये ही ऊर्जा जास्त असते आणि मीठ ती संतुलित करते. म्हणून, बाथरूममध्ये मिठाची वाटी ठेवा आणि ते मीठ ओलसर झाले असता दुसरे ठेवा  

तणावमुक्ती : बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने वास्तूमधील नकारात्मकता दूर होऊन कुटुंबियांना सकारात्मक बदल जाणवू लागतात. मानसिक ताण, काळजी, चिंता दूर होऊन अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागतो. 

वास्तुदोषाचे निवारण : जर बाथरूम चुकीच्या दिशेने असेल किंवा तिथून वास्तुदोष निर्माण होत असतील तर मीठ ठेवून त्याचा प्रभाव कमी करता येतो. जर तुमचे बाथरूम चुकून उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल तर बाथरूममध्ये सैंधव मीठ ठेवणे तुमच्यासाठी विशेष फायदेशीर ठरेल.

आरोग्याचे रक्षण : बाथरूममध्ये असलेले बॅक्टेरिया, विषाणू आणि दुर्गंधी काढून टाकण्यास देखील मिठाची मदत होते. वातावरण स्वच्छ आणि ताजे राहते. ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या देखील कमी होतात. मिठामध्ये दुर्गंधी शोषून घेण्याची शक्ती असते. बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने तुम्हाला तिथे स्वच्छतेची जाणीव होते. 

आर्थिक समस्येतून मुक्ती : असे म्हटले जाते की बाथरूममधून निर्माण होणारी नकारात्मकता कुटुंबाच्या समृद्धीवर परिणाम करते. तिथे मीठ ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती स्थिर होते आणि पैशाच्या वाढीत येणारे अडथळे दूर होतात. घरात सकारात्मक वातावरण वाढते. कुटुंबाची भरभराट होते. 

मीठ कसे ठेवायचे?

>> एका काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात थोडेसे जाडे मीठ किंवा सैंधव घ्या आणि ते बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा.
>> दर शनिवारी हे मीठ बदला आणि जुने मीठ वाहत्या पाण्यात टाका.
>> तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्या भांड्यात कापूर किंवा लवंग देखील ठेवू शकता जेणेकरून त्याचा परिणाम आणखी वाढेल.

Web Title: Vastu Shastra: Using salt in the house on Saturday removes Vastu defects!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.