शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Vastu Shastra: नवीन वर्षात एकही संकल्प न करण्याचा संकल्प करा, त्याऐवजी 'या' गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, फायदा होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 17:57 IST

Vastu Tips: नववर्षात दिनदर्शिका बदलण्याबरोबर आणखीही अनेक बदल करणे गरजेचे आणि आपल्या हिताचे आहेत, कोणते ते जाणून घ्या!

>>अस्मिता दीक्षित 

आपण आपल्या मनाला सतत कशात तरी अडकून पडायची जणू सवयच लावलेली आहे . सहज काहीच सुटत नाही आणि आपली सोडायची मानसिकता सुद्धा नसते. आपण सगळे जमा करून ठेवतो मग त्या घरातील अनेक वस्तू, कपडे असोत कि मनातील आठवणी आणि नको नको ती माणसे सुद्धा. वास्तू शास्त्र सांगते कि ६ महिने एखादी गोष्ट वापरली नाही तर टाकून द्या, घरात अडगळ करून ठेवू नका जसे जुनी न चालणारी घड्याळे, कपडे, दोऱ्या, पेपरची , दुधाच्या पिशव्यांची रद्दी ,द्या सगळे टाकून ....अशाच अवस्थेत एखादी वस्तू दुसऱ्याला द्या कि समोरचा अजून ६ महिने ती वस्तू वापरू शकला पाहिजे. पण नाही सगळे उराशी कवटाळून बसायचे. 

घरात चार घड्याळे असतात आणि प्रत्येक घड्याळात वेगवेगळे वाजलेले असतात मग घरातील चार लोकांची मते सुद्धा चार वेगवेगळीच असणार कि नाही . असो तर सांगायचे असे की मनाला आता ह्यात सगळ्यात अडकवून ठेवू नका, मागचे मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा, पुढे मोकळे आकाश आपल्याला गवसणी घालू पाहते आहे, खूप नवीन अनुभव अजून घ्यायचे आहेत , खूप खूप लोक भेटायची आहेत ,नवीन बंध जुळायचे आहेत, पुढचे आयुष्य तुमची पुढील वळणावर आतुरतेने वाट पाहत आहे. पण आपण हा नाही बोलत तो नाही बोलत ह्याने असे केले आणि त्याने असे केले ह्यातून बाहेरच नाही पडत ...सोडून द्या. जो आपला असेल तो आपल्यासोबत असणारच आहे इतरांची पर्वा आपण का करायची. कारण आज माणसे कामापुरती वापरण्याची फ्याशन आहे.  जुने जाईल तेव्हाच नवीन येईल. 

पाणी जेव्हा वाहते असते तेव्हाच ते पिण्याजोगे असते नाहीतर त्याचे डबके होते . जुना ड्रेस द्या आणि नवीन आणा . सगळे जुने टाकून द्या आणि नवीन गोष्टीनी घर सजवा. जुन्या आठवणी क्लेशदायक असतात किती दिवस तिथेच अडकून पडणार आपण , शेवटी ज्याचे त्याचे कर्म आपल्यासोबत . किती आणि कायकाय मनाला लावून घ्यायचे आणि कश्यासाठी , लोक मजेत आनंदात जगत आहेत मग आपणच हा मनाला दुक्ख देत देत जगायचे.  वरचा बसला आहे आणि तो सगळ्याचा हिशोब वेळ आली कि करतोच आणि तो त्याचाच अधिकार आहे ह्यावर माझा विश्वास आहे .

आज समुपदेशन करताना लक्षात येते कि लोक त्याची मनाची शांतता घालवून बसली आहेत ,त्याच त्याच पाशात अडकली आहेत त्यामुळे आयुष्य जगायचेच विसरून गेली आहेत . तुम्ही कितीही चांगले वागा हा समाज तुम्हाला जगू देत नाही हे सत्य आहे . कुणालाही कुणाचे चांगले झालेले पाहवत नाही मग अशी लोक कश्याला हवी तुमच्या मित्र यादीत ? काय संबंध ? अचानक बोलणे बंद करणे अचानक आपल्या आयुष्यातून निघून जाणारी माणसे आपल्या मनाचा क्षणभर सुद्धा विचार करत नाहीत मग आपण सुद्धा त्यांचा का विचार करायचा? ती आपली कधीच नव्हती . आपण आपले मुक्त नक्कीच जगू शकतो का नाही? प्रयत्न करून बघा नक्कीच यशस्वी व्हाल. आज रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणी मोठमोठाली आव्हाने आहेत. 

आजची तरुण पिढी प्रचंड स्ट्रेस मध्ये जगत आहे , मुला मुलींची लग्नाची वये खूप पुढे गेली आहेत . काही मुले तर इतरांचे अनुभव ऐकून लग्न नकोच म्हणतात . आज लग्न संस्था मोडकळीला आलेली आहे कारण जबाबदारी कुणाला नको आणि आपण एकटे जगू शकतो हा पराकोटीचा अहंकार .पण हा विचार अजून १० वर्षांनी टिकणारा नाही तेव्हा वय निघून गेलेलें असेल. असो . 

आपल्याला देवाने दिलेले २४ तास खूप काही करायला पुरेसे आहेत . स्वतःला आनंदी ठेवणे हा आजचा मोठा चालेंज आहे ,पटतंय का? कारण अर्ध आयुष्य दुसऱ्याला काय वाटेल ह्यातच व्यतीत झालय आपले. आयुष्यभर साडी नेसणाऱ्या काकू नी खरच एकदातरी  ड्रेस घालून बघावा , मग बघा त्या बदलेल्या वस्त्राबरोबर त्यांना किती मोकळे ढाकळे वाटेल. अशीच मनावर असंख्य वर्ष चढलेली नको नको त्या आठवणींची  पुटे,  जळमटे सुद्धा दूर करा , मनाची साफसफाई करतच पुढील आयुष्याचा प्रवास करुया. नाहीतर जगातील सगळे आजार होतील. माणसाचे मन आजारी पडते आणि मग शरीर म्हणूनच मनाला आनंदी ठेवण्याचा ध्यास घ्या .

नवीन वर्षात कुठलेही संकल्प करू नका कारण ते २४ सुद्धा टिकत नाहीत. चालायला जायचे आहे ना? शुभस्य शीघ्रम .उठा आणि चालायला जा ठरवू बिरवू काही नका just do it. आपल स्वतंत्र व्यक्तिमत्व जपा , आपल्या मताला सर्वप्रथम आपणच किंमत द्यायची असते तरच इतर देतील. केलेल्या चुका मोठ्या मनाने स्वीकारा तरच मन शांत होयील आणि काहीतरी मार्ग मिळेल. दुसर्याला दोष देत बसू नका ,खूप झाले ते आता . कायम दुसर्यावर अवलंबून रहायची सवय सोडून दिली पाहिजे. स्पष्ट बोलणे आणि फटकळ बोलणे ह्यात फरक आहे जो कित्येकांना समजत नाही कारण तितकी कुवत नसते . पण आपण आपली मते ठामपणे मांडायला शिकले पाहिजे .  आपण एकटे येतो आणि एकटेच जाणार आहोत आणि हेच अंतिम सत्य आहे जे बदलणार नाही त्यामुळे स्वतःचे छंद जोपासा. कशाला कायम सतत कुणीतरी हवे बरोबर . आज जितकी कमी माणसे आपल्यासोबत आणि जितक्या कमीतकमी बातम्या तितके आपण सुखी . आज घरात कुणी विचारत नाहीत म्हणून फेसबुकवर गर्दी करणारे अनेक आहेत ,सतत कुणालातरी शोधात राहणारे ,सगळेच नाहीत पण आहेत . 

अहो प्रत्येकाला दुःख आहे फक्त त्याचे स्वरूप वेगळे आहे , म्हंटलेच आहे ना जगी सर्व सुखी असा कोण आहे ? जीवन जगून खूप झाले पण आपल्या स्वतःच्या मनात त्याच्या अंतरंगात डोकवायचे राहूनच गेले. मला काय हवे आहे ? मला काय वाटते हे सगळ्यात महत्वाचे आहे. स्वतःच्या अस्तित्वाची ओळख आणि आपल्या ह्या जन्माचे प्रयोजन अति महत्वाचे आहे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे उपासना , साधना आणि ध्यानातून नक्कीच मिळतील निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे. आपल्याला जे करायचे ते आपण बरोबर करतो आणि जे करायचे नाही त्यासाठी १०० कारणे सांगतो. बघा विचार करा . 

आपल्या मनाचा कल कुठे आहे ते आपल्याला माहित असते , वाचन , लेखन ह्यांनी सैरावैरा पळणारे मन  नक्कीच शांत होईल. आपली विचारधारा पक्की असणे , नियत साफ असणे आवश्यक आहे . देवाने सगळ्यांना संधी दिली आहे पण आपण त्याचा उपयोग किती करतो ते आपल्या हातात आहे . आज कुठलाही विषय किंवा क्षेत्र घ्या अत्यंत वाईट स्पर्धा , दुसर्याला खाली खेचण्याची मनोवृत्ती सर्व आहेच पण ह्यातूनही आपल्याला आपला प्रवास आनंदी करायचा आहे हे आव्हान आहे . यशाचे  शिवधनुष्य पेलण्याची जिद्द आपण ठेवायचीच आहे कारण आपले सद्गुरू अनंत हाताने आपल्या मागे उभे आहेत .

संपर्क : 8104639230 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र