Vastu Shastra : वास्तुशास्त्र तज्ञांच्या मदतीने नवरात्रीसाठी आपल्या वास्तूला सज्ज करा आणि लाभ मिळवा; टिप्स मिळवा लोकमत भक्तीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2022 14:21 IST2022-09-23T14:20:36+5:302022-09-23T14:21:01+5:30
Navratri 2022: श्रीसुक्तात वर्णन केले आहे, की वास्तूमधील अलक्ष्मी अर्थात वाईट शक्ती जोवर बाहेर जात नाही तोवर वैभव लक्ष्मी गृह प्रवेश करत नाही. या अलक्ष्मीला घालवण्याचे तोडगे आजच्या सत्रात आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : वास्तुशास्त्र तज्ञांच्या मदतीने नवरात्रीसाठी आपल्या वास्तूला सज्ज करा आणि लाभ मिळवा; टिप्स मिळवा लोकमत भक्तीवर!
येत्या सोमवार पासून अर्थात २६ सप्टेंबर पासून नवरात्र सुरू होत आहे. घटस्थापनेची प्राथमिक तयारी आपण केली असेलच. त्याबरोबरीने देवीच्या आगमनासाठी आपली वास्तू सज्ज कशी करायला हवी, हे सांगण्यासाठी आज दुपारी ३ वाजता डॉ. रविराज अहिरराव आपल्या भेटीला येत आहेत लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर!
देवीची सगळीच रूपे पूजनीय आहेत. म्हणून तर तिला केवळ लक्ष्मी रूपाने नाही तर शक्ती, भक्ती, ज्ञान, छाया, दया, तृष्णा, क्षुधा इत्यादी रूपात आवाहन करून आपल्या वास्तू मध्ये स्थिरावायला सांगतो. प्रार्थना करतो. परंतु जसे श्रीसुक्तात वर्णन केले आहे, की वास्तूमधील अलक्ष्मी अर्थात वाईट शक्ती जोवर बाहेर जात नाही तोवर वैभव लक्ष्मी गृह प्रवेश करत नाही. या अलक्ष्मीला घालवण्याचे तोडगे आजच्या सत्रात आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचे सत्र अजिबात चुकवू नका. दुपारी ठीक ३ वाजता बघा लोकमत भक्तीचे युट्युब चॅनेल!