Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:52 IST2025-04-24T14:51:20+5:302025-04-24T14:52:37+5:30

Varuthini Ekadashi 2025: वरुथिनी एकादशीनिमित्त म्हणा 'हे' चार पॉवरफुल मंत्र, जे क्षणार्धात करतील राग शांत!

Varuthini Ekadashi 2025: Feeling extremely angry? At that moment, say 'this' mantra, you will calm down in an instant and the dispute will end! | Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 

Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 

राग येणे स्वाभाविक आहे, पण तो नियंत्रणात ठेवणे महाकठीण; रागामुळे निर्माण होणारे वाद, संकट टाळायचे असेल तर वारुथिनी एकादशीनिमित्त (Varuthini Ekadashi 2025) पुढील उपाय अवश्य करा. गीतेत फार सुंदर श्लोक आहे -

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः। 
स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥ 

म्हणजेच क्रोधामुळे मोह निर्माण होतो, मोहामुळे स्मृती बिघडते, स्मृती बिघडल्याने बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाल्यास व्यक्ती स्वतःचा नाश करून घेतो. त्यामुळे क्रोधावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. 

छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे, रागाने डोळे लाल होणे आणि रागाच्या भरात स्वतःचे काम बिघडवून घेणे, हे रागाचे दुष्परिणाम आहेत. म्हणूनच आपल्याला रागावू नका असे सांगितले जाते. मात्र प्रयत्न करूनही तुमचा राग आटोक्यात येत नसेल तर पुढील श्लोक, मंत्र तुम्हाला उपयुक्त ठरतील. त्यासाठी पुढीलपैकी कोणताही मंत्र पाठ करा आणि रागाच्या क्षणी मनातल्या मनात त्याचे उच्चारण करा, तुम्हाला त्याचा लाभ होईल!

श्रीकृष्ण मंत्र : 

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम:।।

या मंत्राचा अर्थ असा आहे की, हे वासुदेवपुत्र, मी तुला परम पुरुष श्रीकृष्णाच्या रूपात नमस्कार करतो. हे गोविंदा, मी तुला नमस्कार करतो. माझे सर्व संकटे नष्ट कर. सर्व दुःखांचा नाश करणारे श्रीकृष्ण, वासुदेव, हरि, मी देवा, गोविंदला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. या मंत्रात भरपूर शक्ती आणि ऊर्जा आहे. म्हणून रागाच्या क्षणी या मंत्राचा जप करा. 

मंगळ मंत्र : 

ऊं क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः।

मंगळाच्या बीज मंत्राचा अर्थ आहे, मी भौमाची म्हणजेच मंगळाची  भक्तीभावाने पूजा करतो. भूमीचा पुत्र असल्याने मंगळाला भौम असेही म्हणतात. मंगळ ग्रह हा क्रोध आणि कामवासनेचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत, हा मंत्र रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. या मंत्राचा जप केल्याने आत्मविश्वास आणि संयम वाढतो. 

राहू बीज मंत्र : 

ऊं भ्रां भ्रीं भ्रौं स: राहुवे नम:।

जर एखादी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावते, चिडचिड करते आणि गोंधळते, तर हे राहूचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत राहूच्या या बीज मंत्राचा जप केल्याने रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. करू शकतो. हा मंत्र व्यक्तीला नकारात्मकतेशी लढण्याची शक्ती देतो. व्यक्तीचे तेजोवलय वाढवतो.

विष्णू मंत्र : 

 मंत्र : ऊं नमो भगवते वासुदेवाय।

श्लोक : शान्ताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम्।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभ्यहरं सर्वलोकैकनाथम्।।

असे मानले जाते की वैष्णव मंत्र स्वतःच एक अतिशय शक्तिशाली मंत्र आहे. याचा जप केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळू शकतो आणि ज्याच्यावर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आहे त्याला कोणत्याही अडचणी येत नाहीत आणि जेव्हा समस्याच नसतील तर मग राग का येईल? याचा अर्थ असा आहे की ध्यान आणि वैष्णव मंत्राच्या जपाने मन शांत आणि नियंत्रित केले जाऊ शकते. 

Web Title: Varuthini Ekadashi 2025: Feeling extremely angry? At that moment, say 'this' mantra, you will calm down in an instant and the dispute will end!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.