शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

Tukaram Beej: तुकाराम बीजेला दुपारी १२ वाजता देहुतील नांदुरकी वृक्ष हलताना पाहण्यासाठी भाविकांची होते गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:49 PM

Tukaeam beej : तुकाराम बीजेच्या दिवशी तुकोबारायांनी ज्या वृक्षावरून वैकुंठ गमन केले, ते स्थान माहात्म्य अनुभवण्यासाठी भाविक आजही या तिथीला मोठी गर्दी करतात. 

फाल्गुन कृष्ण द्वितीया हा दिवस वारकरी पंथीयांसाठी फार महत्त्वाचा दिवस. कारण आजच्याच तिथीला संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी वैकुंठ गमन केले होते. एवढेच नाही, तर इहलोकाची यात्रा संपवण्याआधी या शेवटच्या प्रवासाचे वर्णन करणारे अभंग देखील दूर दृष्टीने लिहून ठेवले होते. तो प्रवास ज्या ठिकाणाहून झाला ते ठिकाण देहू गावात आढळते. हजारो भाविक नेहमी तिथे दर्शनासाठी जातात. विशेषतः आजच्या दिवशी तिथे जास्त गर्दी असते, ती तिथल्या सकारात्मक शक्तीची प्रचिती घेण्यासाठी!

नांदुरकी वृक्ष का हलतो? संत तुकारामांचा जन्म देहू या गावात झाला आणि त्यांनी वैकुंठ गमन केले तेदेखील याच गावातून! त्याठिकाणी तुकारामांचा जन्म जिथे झाला तिथे एक मंदिर आहे, त्यांनी वैकुंठ गमन जिथून केले तिथे एक मंदिर आहे आणि जिथे तुकाराम महाराजांच्या गाथा तरून वर आल्या तिथे गाथा मंदिर आहे. पैकी वैकुंठ मंदिराच्या परिसरात एक चौथरा आहे त्यात नांदुरकी वृक्ष आहे. तुकाराम महाराजांनी देह ठेवण्यापूर्वी पांडुरंगाचे नामस्मरण करत त्याच वृक्षाच्या छायेचा आश्रय घेतला होता. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या कुटुंबासकट सगळे गाव गोळा झाले होते. परंतु तुकाराम महाराज मनाने शेवटच्या प्रवासाला निघाले. त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि दुपारी १२. ०२ मिनिटांच्या सुमारास अर्थात माध्यान्ह समयी विष्णुतत्त्व प्रगट झाले आणि त्यांनी तुकाराम महाराजांना एकरूप करून घेतले. ही घटना गावकऱ्यांच्या देखत घडली. त्याक्षणी ते विष्णुतत्त्व त्या वृक्षात एकवटले आणि समस्त भाविक त्या वृक्षासमोर नतमस्तक झाले. तेव्हापासून तुकाराम बीज या तिथीला बरोबर १२. ०२ मिनिटांनी नांदुरकी वृक्ष हलतो आणि सगळे भाविक त्या विष्णुतत्त्वाची पुनश्च अनुभूती घेतात. 

वृक्ष हलण्यामागील शास्त्र :

वाऱ्याबरोबर झाडं डोलतात, ही नैसर्गिक क्रिया आहेच, मग नांदुरकी वृक्षाचे वेगळे महत्त्व काय? तर त्या तिथीला त्याच वेळेला वृक्षाची होणारी विशिष्ट हालचाल त्या स्थानाचे महत्त्व अधोरेखित करते. संत तुकाराम महाराज हे आपल्यासारखेच संसारी, मात्र त्यांचा अध्यात्मिक अधिकार मोठा म्हणून ते संतपदाला गेले. अशी माणसं मनुष्य देहात असूनही आपल्या अतींद्रिय शक्तीने भविष्याचा वेध घेतात, भाष्य करतात. ज्याला आपण सिक्स्थ सेन्स असे म्हणतो. त्याचा प्रत्यय आपणही घेतो. परंतु आपल्यात आणि तुकाराम महाराजांमध्ये नक्कीच जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांचा अधिकार पाहता त्यांच्यात असलेली सकारात्मकता त्या स्थानामध्ये एकवटली आहे असे म्हटल्यास नाकारण्याचे काहीच कारण नाही. ज्याप्रमाणे मंदिरातल्या लहरी आणि घरातल्या लहरी वेगळ्या असतात, भारावून टाकणाऱ्या असतात, तीच ऊर्जा देहूच्या स्थानात तुकाराम महाराजांमुळे एकवटली आहे. त्यांचे सदेह वैकुंठात जाणे अलौकिक तत्त्वाचे होते. ती ऊर्जा नांदुरकी वृक्षात साठून राहिल्याने त्या तिथीला त्या वेळेला त्याच ऊर्जेची पुनरावृत्ती होत असल्याचे आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही! 

तुकाराम महाराजांचा शेवटचा प्रवास : 

तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले की त्यांच्याशी काही विपरीत घडले, यावर चर्चा करण्यात अनेकांना रस असतो. महाराजांना आपण पाहिले नाही, परंतु त्यांची भूमिका करणारे आणि जगणारे विष्णुपंत पागनीस संत तुकाराम नाटक करत असताना वैकुंठ गमनाच्या प्रसंगात देवाघरी गेले, असे म्हणतात. आज तुकाराम महाराजांची छबी म्हणून विष्णुपंत पागनीस यांचीच छबी पाहिली जाते. त्यांची भूमिका साकारणारी व्यक्ती, त्यांचे व्यक्तिमत्त्व जगणारी व्यक्ती अशा पद्धतीने लौकिक जगाचा निरोप घेऊ शकते, तर प्रत्यक्ष तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले हे नाकारण्याचे कारणच काय? याही पलीकडे महाराज 'कसे गेले'  यापेक्षा 'कसे जगले' यावर चिंतन होणे जास्त महत्त्वाचे नाही का? वयाच्या ४१ व्या वर्षी तुकोबांनी जनसेवा पूर्ण करून जगाचा निरोप घेतला, त्यातुलनेत आपण काय, कसे जगतोय याचा यतार्थ विचार होणे योग्य ठरेल!

टॅग्स :dehuदेहू