हात दाखवून 'शुभ लक्षण' अर्थात तुमच्या भाग्यात सरकारी नोकरी आहे का ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 17:36 IST2021-11-26T17:36:24+5:302021-11-26T17:36:53+5:30
तळहाताच्या काही खास रेषांमधून तुमच्या नशिबात सरकारी नोकरी आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

हात दाखवून 'शुभ लक्षण' अर्थात तुमच्या भाग्यात सरकारी नोकरी आहे का ते जाणून घ्या!
सामान्यतः प्रत्येकाचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. कारण या नोकरीमध्ये नोकरीच्या सुरक्षिततेसोबतच इतर अनेक फायदेशीर सुविधाही उपलब्ध असतात. सरकारी नोकरीसाठी कठोर परिश्रमासोबत नशीबही आवश्यक मानले गेले आहे. सरकारी नोकरी तुमच्या प्रयत्नावर अवलंबून असतेच शिवाय ती नशिबातही असावी लागते. याबाबत हस्तरेषाशास्त्र तपशीलवार सांगते. यानुसार, तळहाताच्या काही खास रेषांमधून तुमच्या नशिबात सरकारी नोकरी आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.
तळहातावर गुरु पर्वत
गुरु पर्वत तर्जनी खाली स्थित असतो. उंचावलेला गुरु पर्वत शुभ मानला जातो. यासोबतच, जर येथे सरळ रेषा कुठेही छेद गेलेली नसेल तर ती व्यक्ती भाग्यवान असते. तिला राजयोग अर्थात सध्याच्या भाषेत स्थैर्य देणारी सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असते.
सूर्य पर्वत
हस्तरेषेमध्ये,सूर्य पर्वत अनामिकेखाली आहे. सरकारी नोकरीसाठी सूर्य पर्वताला विशेष महत्त्व आहे. सूर्य पर्वताच्या बलामुळे सरकारी नोकरीची शक्यता खूप जास्त असते. याशिवाय व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळत राहतो.
भाग्य रेषा
जर हस्तरेषेच्या भाग्य रेषेतून एखादी रेषा निघून थेट गुरू पर्वतावर गेली तर ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. तसेच, सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता खूप जास्त असते. याशिवाय सरकारी नोकऱ्यांमध्येही मोठे अधिकारी पद मिळते.
अंगठ्यावरील चिन्ह
अंगठ्यामध्ये वर्तुळाचे चिन्ह शुभ असते. ज्यांच्या अंगठ्यावर हे चिन्ह असते, असे लोक खूप भाग्यवान असतात. हस्तरेषा शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्यावर वर्तुळाकार चिन्ह असेल तर त्याला सरकारी नोकरीसह प्रत्येक कामात यश मिळते. याशिवाय सर्वात लहान बोटाखाली त्रिकोणाचे (बुध पर्वत) चिन्ह शुभाचे सूचक मानले जाते. अशी शुभ चिन्हे असलेल्या लोकांना सरकारी नोकरी मिळते.