शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

Today Daily Horoscope: 'एखाद्या स्त्रीमुळे येऊ शकता अडचणीत'; कोणत्या राशींना इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 07:38 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष : आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळे आपण खूप चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण व झोप ह्यात अनियमितता येईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आणखी वाचा

वृषभ: आज चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज आपण भावुक व संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती व सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र ह्यात आज आपण काम करू शकाल.आणखी वाचा

मिथुन : आज नातलग व मित्रांशी संवाद साधल्याने आपण आनंदित व्हाल. सुरवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. आणखी वाचा

कर्क : आज आपल्या मनात प्रेमालापाचे तरंग उमटतील. दिवसभर त्याच मनःस्थितीत आपण राहाल. मित्र, स्वकीय व संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील.आणखी वाचा

सिंह : आज कोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे लागेल. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल.आणखी वाचा

कन्या: आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल.आणखी वाचा

तूळ: आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल.आणखी वाचा

वृश्चिक: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. लेखन - साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल असेल.आणखी वाचा

धनु: आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. आजारा वरील नवीन उपचारास सुद्धा प्रारंभ न करणे हितावह राहील. वाणी व वर्तन संयमित ठेवणे हिताचे राहील.आणखी वाचा

मकर: 11 फेब्रुवारी, 2025 मंगळवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल.आणखी वाचा 

कुंभ: सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळाल्याने प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. स्त्रीयांना माहेरहून अनेक चांगल्या बातम्या मिळतील.  आणखी वाचा

मीन: 11 फेब्रुवारी, 2025 मंगळवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल.आणखी वाचा

टॅग्स :horoscope 2021राशिभविष्य २०२१daily horoscopeदैनिक राशीभविष्य