शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

'७०० वर्षं जगणार' असे ज्योतिषांनी भाकीत करूनही संजीवन समाधी घेतलेले राघवेंद्र स्वामी यांची आज पुण्यतिथी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 12:36 IST

राघवेंद्र स्वामींचा व्यासंग, त्यांची प्रतिमा, त्यांचा प्रेमळ लाघवी स्वभाव या साऱ्यामुळे स्वामींकडे जो येई तो त्यांचाच होऊन जाई.

दक्षिणेकडील महान संत म्हणून ज्यांचे आदराने नाव घेतले जाते, ते म्हणजे राघवेंद्र स्वामी. महाराष्ट्रात तसेच जगभरात त्यांचे अनेक अनुयायी आहेत. एक संत म्हणून नावारूपाला येण्याआधी त्यांचे आयुष्यही सर्वसामान्यांसारखे होते. मात्र एकाएक त्यांच्या आयुष्याला कलाटणी कशी मिळाली आणि ते संतपदाला कसे पोहोचले, हा प्रवास जाणून घेऊया ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या लेखणीतून. 

एकदा मंत्रालयात राघवेंद्रस्वामींकडे तीन नामवंत ज्योतिषी आले. राघवेंद्रस्वामींच्या शिष्यांनी उत्सुकतेपोटी त्या तिघांनाही स्वामींची पत्रिका दाखवली. त्यापैकी एका ज्योतिषाने स्वामी शतायुषी म्हणजे शंभर वर्षे आयुष्य असलेले आहेत असे सांगितले. दुसऱ्या ज्योतिषाने स्वामींना तीनशे वर्षांचे आयुष्य लाभले असल्याचे सांगितले. तर तिसऱ्याने चक्क सातशे वर्षांचे आयुष्य लाभणार असे छातीठोकपणे सांगितले. त्या तीन ज्योतिषांची ती तीन वेगवेगळी भविष्ये ऐकून सारी मंडळी चेष्टेने हसू लागली. तेव्हा राघवेंद्रस्वामींनी त्या हसणाऱ्या सर्व मंडळींना थांबवले आणि त्यांना भविष्याचा अर्थ उकलून सांगितला. 

स्वामी म्हणाले, `या तिघांनी सांगितलेली ही तिनही भविष्ये खरीच आहेत. कारण माझे शारीरिक आयुष्य हे शंभर वर्षांचे असले तरी ग्रंथरूपी आयुष्य मात्र तीनशे वर्षांचे असेल आणि मंत्रालयाच्या वृंदावनातील माझे अस्थिरूपातील अस्तित्त्व सातशे वर्षे टिकून राहील' स्वामींच्या या समजावून सांगण्याने मंडळींच्या मनातील शंकांचे निरसन झाले. नंतर स्वीमींनी त्या तिन्ही ज्योतिषांचा योग्य आदरसत्कार करून समारंभपूर्वक त्यांना मोठ्या प्रेमाने निरोप दिला. 

मंत्रालयाच्या राघवेंद्रस्वामींचे मूळचे नाव होते व्यंकण्णाचार्य. त्यांचे प्रारंभीचे सारे शिक्षण श्रीपादस्वामींकडे झाले. व्यंकप्पा लाघवी, शांत आणि अभ्यासूवृत्तीचे असल्यामुळे आई वडील, शेजारी, गावकरी, गुरुजन या साऱ्यांनाच ते आवडत. यथावकाश लग्न झाल्यावर सुशील पत्नीमुळे घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असूनही त्यांचे सांसारिक जीवन अत्यंत सुखसमाधानात व्यतीत होत होते. मुलगा झाल्यावरही व्यंकण्णांची मूळची अभ्यासवृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून मग त्यांनी पुढील शिक्षण सुधींद्रतीर्थांकडे घेण्यास सुरुवात केली. सुधींद्रतीर्थ व्यंकण्णांना मठाचे भूषण मानीत असत. गावोगावी भरणाऱ्या विविध सभांमध्ये वादविवादामध्ये व्यंकण्णा नेहमीच जिंकत असे, त्यामुळेही सुधींद्रतीर्थांना त्याचा अभिमान वाटत असे. त्यातच शिकत असतानाच व्यंकण्णांने मध्वविजय हा पहिला ग्रंथ लिहिला. 

पुढे एका दृष्टांतानुसार सुधींद्रतीर्थांनी व्यंकण्णाला मठाधिपती करण्याचे ठरवले. पण प्रेमळ पत्नीला त्यागून संन्यासदीक्षा घेण्याबद्दल व्यंकण्णांचा निश्चय होईना. लोकसमजुतीप्रमाणे एका रात्री साक्षात देवी सरस्वतीने त्यांना स्वप्नात येऊन समजावले. त्यानुसार अखेर शके १५४५ च्या फाल्गुन वद्य द्वितीयेला सुधींद्रतीर्थांनी त्यांना दीक्षा दिली. त्यांचे राघवेंद्रतीर्थ असे नामकरण केले. मठाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्याच दिवशी सायंकाळी स्वत: सुधींद्रतीर्थांनी वृंदावन प्रवेश केला.

या घटनेने राघवेंद्रस्वामी अबोल झाले. त्यातच पतीने संन्यासदीक्षा घेतलेली पाहून त्यांच्या प्रिय पत्नीनेही विहिरीत उडी मारून प्राणत्याग केला. जड मनाने तिला मुक्ती देऊ मग स्वामी धर्मप्रसारासाठी देशाटनाला गेले. त्या वेळी उडपी येथील कृष्णमठातून स्वामींचा पाय निघेना. इतके तेथील वातावरण प्रेमपूर्व आणि भक्तिभावाने ओथंबलेले होते. म्हणून मग वर्षभर तिथेच मुक्काम करून स्वामींनी तंत्रदीपिका, न्यायमुक्तावली आणि चंद्रिकाप्रकाश हे तीन ग्रंथ लिहिले. स्वामींचा व्यासंग, त्यांची प्रतिमा, त्यांचा प्रेमळ लाघवी स्वभाव या साऱ्यामुळे स्वामींकडे जो येई तो त्यांचाच होऊन जाई. त्यांची लोकप्रियता हाही चमत्कारच म्हणावा लागेल.

शके १५९३ च्या श्रावण वद्य प्रतिपदेला गुरुवारी स्वामींनी वृंदावनप्रवेश केला. स्वामी कुर्मासन घालून पूर्वाभिमुख बसले. त्यांनी दृष्टी समोरच्या मारुतीकडे लावली. 'माझी जपमाळ थंबली की, सातशे शाळिग्राम वृंदावनात ठेवावेत' असे स्वामींनी आधीच सांगून ठेवले होते. त्याप्रमाणे जेव्हा त्यांच्या हातातील जपमाळ फिरण्याची थांबली तेव्हा शिष्यमंडळींनी आणि ग्रामस्थ भक्तमंडळींनी वृंदावनात सातशे शाळिग्राम ठेवले. वर नृसिंहाची मूर्ती स्थापली गेली. आजही मंत्रालयातील स्वामींचा मठ हे स्वामींच्या सर्वदूर पसरलेल्या भक्तगणांचे फार मोठे आधारस्थान आहे. अशा राघवेंद्र स्वामींची आज पुण्यतिथी आहे. आपण त्यांच्या पुण्यपावन स्मृतीला आदरपूर्वक नमस्कार करूया.