शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

चारही युगात ज्यांनी आपल्या स्थापत्यशैलीचे उत्तमोत्तम नमुने दिले, त्या भगवान विश्वकर्मा यांची आज जयंती!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 25, 2021 11:14 AM

आपण व्यापारी असो अथवा नसो, या सुंदर सृष्टीच्या रचेत्याप्रती कृतद्न्यता व्यक्त करण्यासाठी आपणही भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे पूजा करूया.

भगवान विश्वकर्मा हे या सृष्टीचे पहिले स्थापत्यकार मानले जातात. चारही युगांमध्ये त्यांनी निर्मित केलेल्या वास्तूंचे दाखले आहेत. त्यांनी कृष्णाची द्वारका, पांडवांची मयसभा, देवी देवतांसाठी आलिशान महाल, स्वर्गलोक, लंका, हस्तिनापूर, इंद्रपुरी, जगन्नाथ पुरी वसवली. जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथाच्या मंदिरातील  कृष्ण, सुभद्रा आणि बलरामाची मूर्ती त्यांनीच निर्माण केली आहे. तसेच भगवान शंकरासाठी त्रिशूळ,  भगवान विष्णूंसाठी कवच कुंडल, महारथी कर्ण साठी कवच कुंडलांची निर्मिती त्यांनीच केली होती.  त्यांची वैज्ञानिक आणि स्थापत्य शास्त्रातील दूरदृष्टी पाहून त्यांना ऋग्वेदात स्थान दिले आहे. त्यांची कारागिरी पाहून त्यांना वास्तूदेवाचे सुपुत्र असेही म्हटले जाते. 

माघे शुकले त्रयोदश्यां दिवापुष्पे पुनर्वसौ।अष्टा र्विशति में जातो विशवकर्मा भवनि च॥

धर्मशास्त्रानुसार मग शुक्ल त्रयोदशीला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते. यादिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते. मुख्यत्वे व्यापारी वर्गात अतिशय आस्थेने विश्वकर्मा जयंतीचा दिवस साजरा केला जातो. तसेच त्यांच्या आशीर्वादाने काम व्हावे, यासाठी कार्यालयात विश्वकर्मा यांची तसबीरही आढळते. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी या प्रतिमेचे सामूहिकपणे साग्रसंगीत पूजन केले जाते. 

आपण व्यापारी असो अथवा नसो, या सुंदर सृष्टीच्या रचेत्याप्रती कृतद्न्यता व्यक्त करण्यासाठी आपणही भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे पूजा करूया. पूजा विधी नेहमीचाच आहे. फक्त त्याला काही मंत्रांची जोड द्यावी. जसे की, ॐ आधार शक्तपे नमः , ॐ कूमयि नमः, ॐ अनंतम नमः, ॐ पृथिव्यै नमः। या मंत्रांचे उच्चारण करून मनःपूर्वक नमस्कार करावा आणि या सृष्टीचे त्यांनी सदैव पालन आणि रक्षण करावे, म्हणून प्रार्थना करावी. 

भगवान विश्वकर्मा की जय।।