कुंभमेळा असो किंवा हिमालयातील दुर्गम भाग, नागा साधू त्यांच्या विशिष्ट जीवनशैलीमुळे नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतात. या साधूंकडे भौतिक संपत्ती नसली तरी त्यांच्याकडे एक महत्त्वाचं पात्र असते, ज्याला 'ब्रह्म पात्र' किंवा 'तुंबा पात्र' म्हटले जाते. या पात्राचा नागा साधूंशी असलेला गूढ संबंध आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊ.
Swapna Shastra: स्वप्नात दिसणाऱ्या विचित्र गोष्टींचा तुमच्या खऱ्या आयुष्याशी काय संबंध असतो?
नागा साधूंच्या हातात असलेले लाकडी किंवा भोपळ्यापासून बनवलेले पात्र तुम्ही पाहिले असेल. हे पात्र म्हणजे साक्षात ब्रह्माजींचा आशीर्वाद मानले जाते. या पात्राचे महत्त्व केवळ पाणी पिण्यापुरते मर्यादित नसून त्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पैलू अतिशय रंजक आहेत.
ब्रह्म पात्र म्हणजे काय?
हे पात्र एका विशिष्ट प्रकारच्या सुकलेल्या भोपळ्यापासून (Lauki/Bottle Gourd) तयार केले जाते, ज्याला 'तुंबा' म्हणतात. नागा साधूंच्या मते, ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीवेळी या पात्राचे सृजन केले. निसर्गाने हे पात्र मुळातच कडू तसेच तिखट बनवले आहे, जेणेकरून प्राणी त्याला खाऊ शकणार नाहीत, हा त्यामागचा हेतू आहे.
नागा साधू आणि ब्रह्म पात्राचा गूढ संबंध:
१. साधूंची एकमेव 'तिजोरी': नागा साधू दिगंबर (वस्त्रहीन) राहतात. त्यांच्याकडे घर, कपाट किंवा बॅग नसते. अशा वेळी हे ब्रह्म पात्रच त्यांची सर्वस्व असते. भिक्षा मागणे, अन्न ग्रहण करणे आणि पाणी पिणे या सर्व गोष्टींसाठी ते याच पात्राचा वापर करतात.
२. पवित्रता आणि नियम: साधू या पात्राला अत्यंत पवित्र मानतात. ते हे पात्र कधीही अशुद्ध ठिकाणी ठेवत नाहीत. झोपताना ते हे पात्र आपल्या उशाशी ठेवतात किंवा काठीवर टांगून ठेवतात. जर हे पात्र चुकून तुटले, तर ते अशुभ मानले जाते आणि साधूला त्यासाठी प्रायश्चित्त करावे लागते.
३. पोहण्यासाठी उपयुक्त: हे पात्र वजनाला अत्यंत हलके असते. जेव्हा साधू नद्या पार करतात किंवा पुरात पोहतात, तेव्हा हे ब्रह्म पात्र त्यांना पाण्यात तरंगण्यास मदत करते. हे पात्र कधीही बुडत नाही, त्यामुळे ते 'लाईफ जॅकेट' प्रमाणे काम करते.
Vastu Tips: घरात सतत कटकटी? एका ग्लास पाण्यात लवंग टाकून पाहा; कळेल धक्कादायक सत्य!
वैज्ञानिक आणि आरोग्यदायी पैलू:
ब्रह्म पात्र किंवा तुंब्यामध्ये ठेवलेले पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध राहते. हे पाणी 'अल्कलाईन' (Alkaline) होते, जे पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. कठीण तपश्चर्या करणाऱ्या साधूंना पचनसंस्थेचे विकार होऊ नयेत, यासाठी या पात्रातील पाणी औषधासारखे काम करते.
एक एक भांडं जोडत संसार उभा करणारे आपण, जेव्हा पसारा आवरण्याची वेळ येते तेव्हा हतबल होतो. काय ठेवावे, काय टाकावे हा आपल्यासमोर प्रश्न असतो. कारण कष्टाने, प्रेमाने, आठवणीने जोडलेल्या असंख्य गोष्टी आपण जमवलेल्या असतात. म्हणूनच आपण संसारी ठरतो आणि केवळ एका पात्रात आपल्या सर्व गरजा भागवणारे निर्मोही लोक नागा साधू ठरतात.
औदुंबर पंचमी: साक्षात कल्पवृक्षाच्या पूजेचा दिवस; 'या' पद्धतीने करा साधना, मिळेल गुरूंचा आशीर्वाद
Web Summary : Naga Sadhus highly value their 'Brahma Patra,' a gourd vessel. It serves as their only possession for begging, eating, and drinking. It's considered sacred, aids in floating, and its water is believed to have medicinal properties. Losing it invites severe penance.
Web Summary : नागा साधु अपने 'ब्रह्म पात्र' को अत्यधिक महत्व देते हैं, जो एक लौकी का बर्तन है। यह भिक्षा मांगने, खाने और पीने के लिए उनकी एकमात्र संपत्ति है। इसे पवित्र माना जाता है, यह तैरने में मदद करता है, और इसके पानी को औषधीय गुणों वाला माना जाता है। इसे खोने पर कठोर तपस्या करनी पड़ती है।