शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे 'हे' विचार लक्षात घेतले पाहिजेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 11:06 IST

३० एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे; ज्यांनी ग्रामविकास व्हावा म्हणून ग्रामगीता लिहिली. त्यात ते म्हणताहेत...

अरे उठा, उठा, श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो,पंडितांनो, सुशिक्षितांनो, साधुसंतांनो,हाक आली क्रांतीची।गावा गावासि जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा,उजळा ग्रामोन्नतीचा दिवा।या दोन ओव्या वाचल्या तरी संत तुकडोजी महाराजांची ग्राम कल्याणाविषयीची आर्त हाक पूर्णपणे लक्षात येते. ग्रामविकास झाला तरच देशविकास होईल. कारण मूळ भारत हा आजही खेड्यातच वसलेला आहे. ग्रामस्थांच्या हातांना रोजगार मिळाला तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत, शहराच्या सुव्यवस्थेवर अतिरिक्त भार येणार नाही, गावं संपन्न होतील आणि पर्यायाने राष्ट्रही संपन्न होईल. अर्थार्जनाकडे आणि ग्रामविकासाकडे भर देत तुकडोजी महाराजांनी केलेली ही श्लोक निर्मिती म्हणजे दूरदृष्टीने केलेले भाकीतच म्हणता येईल, नाही का? त्यांची संपूर्ण ग्रामगीता वाचली तर तुकडोजी महाराजांची ग्रामविकासाबद्दल असलेली कळकळ शब्दाशब्दातून जाणवेल. सद्यस्थितीत रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध पाहता भविष्यातील समृद्ध कोकणास अधिक उद्यमशील बनवण्याच्या प्रक्रियेत आपणच अडथळा निर्माण करत आहोत का, याचा दूरदृष्टीने आणि सर्वांगीण विचार करायला हवा.तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. प्रा. सोनोपंत दांडेकर त्यांचेविषयी लिहितात, श्रीसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रामसेवेच्या बाबतीत अधिकार खूपच मोठा होता, हे विश्वश्रुत आहे. आधी केले मग सांगितले, हे त्यांच्याबाबतीत अक्षरश: खरे ठरले. त्यांच्या खंजीरी भजनाचे आकर्षण एवढे होते, की ते ऐकायला हजारो गावकरी गोळा हो असत. त्यांच्या भजनांची पुस्तके छापून आली आणि पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासक्रमात देखील वापरली गेली.तुकडोजी महाराजांचे मूळ नाव 'माणिक' असे होते. बालपणीच अडकोजी महाराजांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी परमार्थ मार्गातील साधना करण्यात काही वर्षे घालवली. ही साधना सुरू असताना त्यांनी जगास उपदेश करण्याचे कार्य सुरू केले. आधी फक्त ईश्वरभजनावर त्यांचा भर होता, परंतु महात्माजींच्या युगापासून त्यांनी गावातील सामाजिक सुधारणा, सर्वांगीण सुधारणा याचीही जोड दिली. किंबहुना, भजनाचा उपयोग प्रामुख्याने मानवाच्या सर्वांगीण उद्धारासाठी केला.तुकडोजी महाराजांनी केवळ गावोगावी फिरून नुसते भजन केल नाही, तर 'श्रीगुरुदेव' यानावाने मासिक काढून कित्येक वर्षे ते चालवले. ग्रामसफाई, सुतकताई, दवाखाने, शाळा, प्रार्थना अनेक गोष्टींद्वारे त्यांनी खेड्यांना शिस्तीचे व समाजसेवेचे वळण लावले.१९३२ नंतर तुकड्याबोवा 'तुकडोजी' महाराज झाले. त्यांच्या कार्यकत्र्यांचे जाळे सर्वत्र पसरायला लागले. गावोगावी सामुदायिक प्रार्थना होऊ लागल्या. भजन मंडळे स्थापन होऊ लागली. शेकडो सेवक निर्माण होऊ लागले. आधुनिक विज्ञानाचे भांडवल नसतानाही निष्ठा व श्रद्धा या शिदोरीवर समाजाच्या मूलभूत प्रेरणेला जागृत करण्याचे काम होऊ लागले. खेड्यातील अज्ञ जनता शिस्तबद्ध होऊ लागली. खेड्यात खराटे खरखरू लागले, रस्ते, नाले बांधले जाऊ लागले. हे कार्य ज्या शब्दांनी, ज्या भावनांनी, ज्या विचारांनी साधले त्या सगळ्याचा सुव्यवस्थित ग्रंथ म्हणजे ग्रामगीता! या ग्रंथाबाबत तुकडोजी महाराज म्हणत,ग्रामगीता माझे हृदय, त्यांत बसले सद्गुरुराय,बोध त्यांचा प्रकाशमय, दिपवोनि सोडील ग्रामासि।आजच्या अणुबॉम्बच्या हिंस्र युगामध्ये मानवाच्या खऱ्या उत्थानासाठी ज्या मुलभूत प्रेरणांची गरज आहे, ती प्रेरणा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यातून मिळते. त्यांच्या जयंती निमित्त त्यांना व त्यांच्या अतुल्य कार्याला त्रिवार वंदन!