Tarot Card: उक्तीला कृतीची जोड हवी, या जबाबदारीची जाणीव करून देणारा आठवडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 09:54 AM2024-06-08T09:54:11+5:302024-06-08T09:54:40+5:30

Tarot Card: टॅरो कार्डच्या मदतीने दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही आगामी साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. 

Tarot Card: Words must be accompanied by actions, a week to realize the responsibility! | Tarot Card: उक्तीला कृतीची जोड हवी, या जबाबदारीची जाणीव करून देणारा आठवडा!

Tarot Card: उक्तीला कृतीची जोड हवी, या जबाबदारीची जाणीव करून देणारा आठवडा!

>>सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
९ ते १५ जून
===============

नंबर १:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या बुध्दीने काम करण्याचे प्रसंग घेऊन येत आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. कामामध्ये संकल्पना आखल्या जातील, नियोजन चांगले होईल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचे बोलणे स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" हे सिद्ध करुन दाखवा. 

नंबर २:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी तडजोडी करण्याचा आहे. अपेक्षित यश मिळवणे कठीण आहे. बरेच कष्ट करावे लागतील. कसलीतरी कमतरता जाणवेल. लोकांवर अवलंबून राहावं लागेल. इतरांकडून हीन वागणूक मिळू शकते. पण या सगळ्यातूनच "आजची रात्र ही उद्याच्या पहाटेची चाहूल घेऊन येते" याचा अनुभव तुम्हाला येईल.

तुम्ही काय करावे?

या आठवड्यात तुम्ही स्वतः संयम ठेवण्याची गरज आहे. गरजा कमी करा. सध्या मोठी गुंतवणूक किंवा महत्त्वाचे व्यवहार टाळा. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा आहे त्यात तुम्ही तुमचं उत्तम कसं करू शकता याकडे लक्ष द्या. परोपकार  करण्याचा प्रयत्न करा. गरिबांना मदत करा. आरोग्य सांभाळा. "पेराल तेच उगवेल" म्हणून आत्ता चांगलेच पेरा!

नंबर ३:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी परीक्षेचा असणार आहे. तुमचा संयम, तुमचा सात्विक भाव आणि तुमची सचोटी या गोष्टींना धक्का लागण्याचे प्रसंग येऊ शकतात. कामे रखडली जातील. काही प्रमाणात हतबल झाल्यासारखं वाटू शकतं. पण हे सगळं सहन केल्यावर पुढे चांगले बदल घडतील. येणार्‍या पहाटेसाठी आजची रात्र गरजेचीच असते हे लक्षात ठेवा!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही स्वतःला कणखर बनवण्याची गरज आहे. कुठल्याही आमिषाला भुलू नका. लाचारी पत्करू नका. सात्विक मनाला योग्य वाटत नसेल ते काम अजिबात करू नका. एवढासा सुद्धा नियम मोडू नका. आखलेल्या चौकटीतंच वागा. जोखीम उचलू नका. व्यसनात गुंतू नका. अती तिथे माती हे लक्षात ठेवा!

श्रीस्वामी समर्थ

संपर्क : 95610 93740

Web Title: Tarot Card: Words must be accompanied by actions, a week to realize the responsibility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.