Tarot Card: होळीचा आठवडा आनंद, उत्साहाच्या रंगाने रंगवून टाकणारा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:02 IST2025-03-08T12:02:10+5:302025-03-08T12:02:29+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: होळीचा आठवडा आनंद, उत्साहाच्या रंगाने रंगवून टाकणारा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
९ ते १५ मार्च
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक सुख देणारा ठरेल. तुम्ही वस्तू, पैसे, लोक, कौशल्य यांनी युक्त असाल. कामामध्ये लोकांकडून चांगला अभिप्राय मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. घराबाबत किंवा जमिनीबाबत चांगली घटना घडेल. या होळीच्या उत्सवात तुमच्यावर समृद्धीचा रंग बरसत राहील!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन नीट करा. कुठे आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. लोकांना मदत करा. सगळ्यांचा सांभाळ करा. व्यावहारिक वागा, पण तुटक वागू नका. वागण्या बोलण्यात धैर्य आणि संयम ठेवा. या होळीत स्वार्थाचे दहन करुन लोकहिताचा रंग खेळा!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी लोकांकडून मदत आणि पाठिंबा घेऊन येत आहे. इतरांवर अवलंबून असलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. जुने मित्र किंवा नातेवाईक, मदतीसाठी तयार असणारे सज्जन लोक तुम्हाला भेटतील. एखादी लहान भेटवस्तू मिळेल. हा रंगांचा उत्सव तुम्हाला शाबासकीतून कौतुक आणि आधाराचा रंग लावून जाईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही लोकांशी सलोखा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्या जवळच्या माणसांना तुमचं म्हणणं मोकळेपणाने सांगा, त्याने तुमचं नातं घट्ट व्हायला मदत होईल. घरातल्यांसोबत निवांत वेळ घालवा. जुन्या आठवणी ताज्या करा. मन जिंकून जग जिंका. या होळीत नकारात्मक भूतकाळाची आहुती देऊन वर्तमानाच्या रंगात रंगून जा!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. एखादा प्रमुख टप्पा गाठला जाईल. त्यामुळे तुम्हाला आतून उत्साह वाटेल. एखादा कार्यक्रम ठरेल. एखादा सण साजरा केल्यासारखा आनंद होईल. सगळ्यांची साथ मिळेल. पुढची वाट मोकळी होईल. या धुलिवंदनाच्या सणात तुम्ही आनंदाच्या रंगात रंगणार आहात!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या परिश्रमाचे चांगले परिणाम अनुभवणार आहात. त्यासाठी तुम्ही थोडी सवड काढण्याची गरज आहे. तुम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. आत्ता पाया मजबूत करुन पुढचे नियोजन करण्याची तयारी सुरु करा. या होळी पौर्णिमेला एकटेपणाचे विचार जाळून एकोप्याचा रंग खेळा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.