साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२२ ते २८ डिसेंबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल पण तरीसुद्धा समाधान वाटणार नाही. आणखी पुढे काहीतरी करायला हवं अशी भावना येईल. भौतिक सुखसोयींपासून एक प्रकारची विरक्ती येऊ शकते. कामामध्ये विलंब होऊ शकतो. एखादं अवघड ध्येय साध्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकाल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाशी एकनिष्ठ राहायचं आहे. खरंच तुम्हाला नक्की काय हवं आहे, याचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे पुढे चाला. उथळ गोष्टींमध्ये अडकून राहू नका. भावनांमध्ये, भूतकाळात किंवा नैराश्यात अडकून राहू नका. मागे घडलेला वाईट प्रसंग सोडून द्या. कुठेही गुंतू नका. उपासना किंवा मेडिटेशन करा, एकांतात वेळ घालवा.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. अडलेल्या गोष्टी काही प्रमाणात पुढे सरकतील. दुरावलेली नाती जवळ येतील. एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. तुम्हाला समाधान लाभेल. लहान मुलांमध्ये मन रमेल. तुम्हाला आतून सकारात्मक आणि तजेलदार वाटेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला मुंगी होऊन साखर खाण्याची गरज आहे. सगळ्यांना मदत करा, दुसऱ्याचे एखादे काम स्वतःहून करा! लहान मुलं जशी निरागसपणे माफी मागून किंवा माफ करून सोडून देतात तसं तुम्हाला वागण्याची गरज आहे. "चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं" या प्रमाणे मन आनंदी ठेवलंत तर घर आनंदी राहील हे लक्षात ठेवून वागा.
नंबर ३:
काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी काही प्रमाणात मागे येण्याचा असणार आहे. एक प्रकारे माघार घ्यावी लागेल. तुम्हाला हवे तसे घडणार नाही. अपेक्षित यश मिळण्यात काहीतरी कमतरता राहील. तडजोड करावी लागेल. पण हे करत असताना कोणाची तरी चांगली साथ मिळू शकते. प्रयत्न करुन प्रगती होईल. प्रवास घडू शकतो.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला शांतपणे कामे करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तडकाफडकी बोलू नका आणि निर्णय ही घेऊ नका. मध्यम मार्ग निवडा. आत्ता माघार घ्यावी लागली तरी हा काळ तात्पुरता आहे हे लक्षात ठेवा. म्हणून स्वतःला त्रास करुन घेऊ नका. उलट आत्मचिंतन करा.
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.