Tarot Card: हा सप्ताह प्रगती घडवून आणणारा, सत्याची कास सोडू नका; वाचा टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:43 IST2025-02-22T11:43:40+5:302025-02-22T11:43:55+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: हा सप्ताह प्रगती घडवून आणणारा, सत्याची कास सोडू नका; वाचा टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२३ फेब्रुवारी ते १ मार्च
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना, नवीन विचार आणि नवीन संवाद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. अनुत्तरित प्रश्न सुटतील. स्पष्ट संवादातून काहीतरी मार्ग निघेल. एकूण परिस्थिती सुधारेल. कामामध्ये, घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घडेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बुद्धिमत्ता आणि वैचारिक कौशल्य वापरण्याची गरज आहे. भावनेपेक्षा तुम्हाला सारासार विचार करून कुठल्यातरी निर्णयापर्यंत पोचण्याची गरज आहे. एखादी नवीन सुरुवात करू शकता. तुमचं संभाषण अत्यंत स्पष्ट आणि खरं ठेवा. तुमचं मत परखडपणे मांडा, पण त्यात अरेरावी नको.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एकंदरीत आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. जे पाहिजे ते मिळण्याची खूप शक्यता आहे. एखादे लहान ध्येय पूर्ण होईल. कलेतून किंवा छंदातून आनंद मिळेल. कुटुंबामध्ये काही कारणाने आनंद राहील, एकोपा राहील. बिघडलेले संबंध सुधारतील. एकत्र येऊन एखादे कार्य पूर्ण कराल. केलेल्या कष्टाचे चीज होईल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण मेहनत करण्याची गरज आहे. शेवटचा टप्पा आला आहे, हा पार करताच यश येणार आहे म्हणून चिकाटीने पुढे चाला. कामाच्या ठिकाणी किंवा घरी, इतरांशी नीट वागा. मिळून मिसळून रहा, मदत करा आणि घ्या. कुटुंबाला वेळ नक्की द्या. अडलेल्याला मदत करा. सगळ्यांचा विचार करा. ध्यान उपासना करा!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी वेगवान असणार आहे. अडकलेली कामे पुढच्या टप्प्यापर्यंत पोचू शकतात. ध्येयाकडे चांगली वाटचाल होईल. सतत होत असलेल्या घडामोडींमुळे अस्थिर आणि अस्वस्थ वाटू शकतं. सडेतोड बोलणाऱ्या व्यक्तींशी सामना होईल. मतभेद होऊ शकतात. तुमच्या कामांना गती मिळेल आणि प्रगती होईल. प्रवास संभवतो.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही धडाडीने आणि विश्वासाने पुढे चालण्याची गरज आहे. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा, रोखठोक वागा. सत्याचीच बाजू घ्या. बुद्धीचातुर्य वापरा. कोणत्याही बाबतीत वेळ गाठा, विलंब नको. संथ न होता, आहात त्या मार्गावर "तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची!" याप्रमाणे वागलात तर यश निश्चितपणे मिळेल! भांडण टाळा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.