साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन८ ते १४ मार्च===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन वाचण्यासाठी १/२/३ पैकी कोणताही एक नंबर निवडा. नंबर निवडताना मनामध्ये एखादा विषय किंवा प्रश्न ठेवून नंबर निवडा आणि मग त्या नंबर साठी तुमच्या विषयानुसार किंवा प्रश्ननुसार मार्गदर्शन वाचा!
नंबर १:
वैयक्तिक आयुष्य - घरात किंवा कुटुंबात मानसिक अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. काहीतरी गमावण्याचा संभव आहे. मन दुखावले जाऊ शकते. संयम ठेवा!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात केलेल्या कष्टाला डावलून एखादी घटना घडेल. त्याने मनात खदखद निर्माण होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा!फायनान्स - आर्थिक बाबतीत अपेक्षित लाभ येण्याची शक्यता खूप कमी आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय टाळा!रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत एखादा अपेक्षाभंग होऊ शकतो. पण अधिक खचून न जाता तुमच्याकडे काय आहे याचा विचार करा. नकारात्मक विचार किंवा स्वतःला कमी लेखणे असे करणे टाळा!शिक्षण/परीक्षा - जास्त कष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. एखादा पेपर हवा तसा जाणार नाही. गेलेल्याचा जास्त विचार करु नका. उद्याचा विचार करा!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात एखादे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खात्री करुन मगंच पैसे गुंतवा!कोर्ट कचेरी - या बाबतीत मनाप्रमाणे यश येणे या आठवड्यात कठीण आहे. उलट समोरच्या पक्षाकडून त्रासदायक घटना घडू शकते.आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत काळजी जास्त घेतलेली चांगली. विशेष करुन सर्दी खोकला व्हायरल त्रासापासून जपा. दूषित पाणी पिणे टाळा.प्रवास - गरजेपुरताच प्रवास करा. फार जोखीम उचलू नका. अती ध्येयवादी नियोजन नको!
नंबर २:
वैयक्तिक आयुष्य - घरात तुमच्याकडून एखादी वैयक्तिक कामगिरी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल कुटुंबात तुम्ही उठून दिसाल, सगळ्यांचे प्रेम मिळवाल!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात तुम्ही एखाद्या महत्वाच्या टप्प्यावर पोहचाल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे फक्त गर्व किंवा बडेजावपणा करु नका!फायनान्स - आर्थिक बाबतीत एखादा फायदा संभवतो. दिलेले पैसे परत मिळू शकतात.रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत पुढचे पाऊल पडेल. तुमच्या कष्टाचं चीज होईल. जोडीदाराकडून तुम्हाला चांगली आदराची वागणूक मिळेल.शिक्षण/परीक्षा - तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल. मागे केलेल्या अभ्यासाचे चांगले फळ मिळेल. फक्त कोणताही चुकीचा मार्ग निवडू नका नाहीतर पकडले जाल!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात तुम्ही आघाडीवर याल. तुमच्या मताला किंमत येईल. फक्त अती महत्त्वाकांक्षा नको!कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या बाजूला न्याय मिळेल. पण काही लोकांच्या डोळ्यात तुम्ही खुपणार त्यामुळे यश मिळाले तर दिखावेबाजी करू नका!आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत सुधारण होईल. इतरांच्या सल्ल्याचा चांगला उपयोग होईल.प्रवास - प्रवासात आनंद मिळेल. एखादा फायदा देखील होऊ शकतो!
नंबर ३:
वैयक्तिक आयुष्य - घरात तुमचा दबदबा राहण्याची शक्यता आहे. वडील किंवा ज्येष्ठ व्यक्तींची गाठभेट होईल त्यातून आनंद मिळेल!नोकरी/व्यवसाय - नोकरी व्यवसायात एक काम पूर्ण होईल. त्याबद्दल वरिष्ठांकडून चांगले कौतुक देखील होऊ शकते, त्यामुळे कामावर पूर्ण लक्ष द्या!फायनान्स - आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. अडकलेल्या पैशांच्या बाबतीत आक्रमक पवित्र घेऊ शकता. रिलेशनशिप - प्रेमाच्या बाबतीत नात्यात अहंकारामुळे ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गोष्टी सोडून देणे योग्य राहील.शिक्षण/परीक्षा - भरपूर कष्ट केले तर यश येईल! तुमच्यात सामर्थ्य आहेच आणि ते बळावेल. फक्त अती उत्साहात अती शहाणपण दाखवू नका!खरेदी/विक्री - खरेदी विक्री संदर्भात तुमच्या म्हणण्याला किंमत येईल. मनासारखे व्यवहार संभवतात!कोर्ट कचेरी - कोर्ट व्यवहारात बिनधास्तपणे लढा. काही प्रमाणात तुमचे वर्चस्व दाखवा. कायद्याला धरुन तुमचे सामर्थ्य आणि शक्ती इतरांना कळू द्या!आरोग्य - आरोग्यात चांगली सुधारणा होईल. तजेलदार वाटेल. सूर्य नमस्कार, सकाळचे व्यायाम, सूर्य दर्शन हे केल्यास उत्तम! फक्त पित्त होणार नाही असा आहार घ्या!प्रवास - प्रवासात अनुकूल वातावरण राहील. दूरचे प्रवास संभवतात. प्रवासात खाणेपिणे आणि स्वतःचे वाहन असल्यास इंधनाच्या बाबतीत व्यवस्थित नियोजन करा.
या मार्गदर्शनाबद्दल आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की ईमेल द्वारे सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही ईमेल द्वारे विचारू शकता.ईमेल संपर्क: sumedhranade531@gmail.com
श्रीस्वामी समर्थ.
Web Summary : Weekly tarot guidance (March 8-14) offers insights into personal life, career, finance, relationships, education, property, legal matters, health, and travel based on chosen number. Each number provides specific advice and predictions.
Web Summary : साप्ताहिक टैरो मार्गदर्शन (8-14 मार्च) व्यक्तिगत जीवन, करियर, वित्त, रिश्तों, शिक्षा, संपत्ति, कानूनी मामलों, स्वास्थ्य और यात्रा पर अंतर्दृष्टि प्रदान करता है, जो चुने हुए नंबर पर आधारित है। प्रत्येक नंबर विशिष्ट सलाह और भविष्यवाणियां देता है।