Tarot Card: येत्या आठवड्यात भाग्याची पतंग घेईल भरारी, मांजा देताना करू नका घाई; वाचा टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:04 IST2025-01-11T12:04:24+5:302025-01-11T12:04:40+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: येत्या आठवड्यात भाग्याची पतंग घेईल भरारी, मांजा देताना करू नका घाई; वाचा टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१२ ते १८ जानेवारी
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
मकर संक्रांतीचा हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाच्या वळणाचा असणार आहे. तुमच्या ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल होणार आहे. अडलेली कामे सुटतील. तुमच्या प्रयत्नांना आणि घेतलेल्या कष्टांना गती मिळेल. इतरांना तुमची नोंद घ्यावी लागेल. योग्य मार्ग सापडेल. पूर्वीचे राहिलेले काम मार्गी लागेल. एक प्रकारचा विजय झाला आहे असे वाटेल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामावर तुमच्या ध्येयावर संपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही संभ्रमात विशेष करुन भावनिक गुंतागुंतीत अजिबात न अडकता तुम्ही तुमचे काम सातत्याने करण्याची गरज आहे. कोणताही किंतू परंतू मनात न ठेवता आत्मविश्वासाने पुढे चाला. दृढ संकल्पाने काम करा. "एकला चलो" प्रमाणे वागलात तर इच्छित सध्या होईल!
नंबर २:
काय घडू शकते?
मकर संक्रांतीचा हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचे बदल घेऊन येत आहे. जर आत्ता तुम्ही निराश असाल तर या आठवड्यात ही परिस्थिती नक्कीच सुधारणार आहे. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टी किंवा माणसं अनुकूल होतील. काही गोष्टींना गती मिळेल, योग्य दिशा मिळेल, महत्त्वाची चालना मिळेल. अडकलेले काम सुटेल. नशिबाची चांगली साथ मिळेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही प्रामाणिक कष्ट करण्याची गरज आहे. आत्ता तुम्ही आनंद उपभोगत असाल तर हीच वेळ आहे दुसऱ्याला मदत करण्याची. निसर्गचक्र लक्षात ठेवा. तुम्ही चांगल्या परिस्थितीत असाल तर त्याचा अभिमान न ठेवता सत्कर्म करा आणि कोणाला दुखवू नका. वेळ कधीही सांगून परीक्षा घेत नाही हे लक्षात ठेवा!
नंबर ३:
काय घडू शकते?
मकर संक्रांतीचा हा सप्ताह तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे. तुम्ही एक मोठा टप्पा गाठणार आहात! मागे केलेल्या नियोजनाला आणि कष्टाला चांगले यश मिळेल. पण मार्गावर पुढे जाण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीची वाट बघावी लागेल. प्रश्न सुटतील असं नाही पण विचार मंथन होईल. लोकांचं सहकार्य मिळेल. यात्रा किंवा प्रवास संभवतात.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही धैर्य आणि संयम ठेवण्याची गरज आहे. आहात त्या मार्गावर पुढे जाताना, विचारमंथन करा, इतरांचे मत जाणून घ्या. कामाचा विस्तार कसा करता येईल हा विचार करा. कोणत्याही परिस्थितीचा सगळ्या बाजूने विचार करा. तुम्ही आज जिथे पोचला आहात त्यात इतरांचा मोलाचा वाटा आहे याची जाणीव ठेवा आणि त्याप्रमाणे वागा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.