Tarot Card: आगामी आठवडा संयमाची परीक्षा बघणारा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 09:45 IST2025-01-04T09:42:07+5:302025-01-04T09:45:47+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: The coming week will be a test of patience; Know your weekly tarot fortune! | Tarot Card: आगामी आठवडा संयमाची परीक्षा बघणारा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!

Tarot Card: आगामी आठवडा संयमाची परीक्षा बघणारा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
५ ते ११ जानेवारी
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

नंबर १:

काय घडू शकते?
नवीन वर्षाचा पहिला सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना, नवीन विचार आणि नवीन संवाद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. अनुत्तरित प्रश्न सुटतील. स्पष्ट संवादातून काहीतरी मार्ग निघेल. एकूण परिस्थिती सुधारेल. कामामध्ये, घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घडेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बुद्धिमत्ता आणि वैचारिक कौशल्य वापरण्याची गरज आहे. भावनेपेक्षा तुम्हाला सारासार विचार करून निर्णयापर्यंत पोचण्याची गरज आहे. एखादी नवीन सुरुवात करू शकता. तुमचं संभाषण अत्यंत स्पष्ट आणि खरं ठेवा. तुमचं मत परखडपणे मांडा, पण त्यात अरेरावी नको.

नंबर २:

काय घडू शकते?
नवीन वर्षाच्या सुरुवातीचा आठवडा तुमच्यासाठी एक अवघड वळण घेऊन येत आहे. तुमचे कष्ट या काळात कमी प्रमाणात फलित होतील म्हणून जास्त अपेक्षा न ठेवलेल्या चांगल्या. वास्तविक परिस्थिती पेक्षा तुमची मानसिक स्थिती कशी आहे यावर तुमचा हा काळ अवलंबून राहील. म्हणून "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!" हे लक्षात ठेवा!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाला येईल तसे वागायला जाऊ नका कारण त्यात तुमची चुकण्याची शक्यता जास्त आहे. कोणत्याही प्रसंगात कोणाचा तरी आधार घेऊन, सल्ला घेऊन पुढे चाला. तुमच्याकडे काय नाही यापेक्षा तुमच्याकडे काही उत्तम आहे, काय चांगले आहे याकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यावर काम करा, यश नक्कीच येईल!

नंबर ३:

काय घडू शकते?
नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी थोडी कठीण असणार आहे. तुम्हाला तुमच्या जागेवर पाय घट्ट रोवून उभं रहावं लागेल. काही लोक, काही स्पर्धक तुम्हाला तुमच्या जागेवरून खाली आणण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जाऊ शकाल. तुम्ही या प्रतिकूल परिस्थितीवर तुमच्या जिद्दीने नक्कीच यश मिळवू शकता.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही येणाऱ्या परिस्थितीला धीराने सामोरे जाण्याची, तुमचं सर्वोत्तम देण्याची गरज आहे. काळजीपूर्वक पुढचे पाऊल टाका. घाबरण्याची गरज नाही. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळी ताकद आहे ज्याने तुम्हाला ही परिस्थिती जिंकता येईल, हा विश्वास ठेवा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा.

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

Web Title: Tarot Card: The coming week will be a test of patience; Know your weekly tarot fortune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.