Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 09:22 IST2024-05-11T09:22:21+5:302024-05-11T09:22:39+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डापैकी एक कार्ड निवडून तुम्हाला तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेता येते.

Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१२ ते १८ मे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी अधिकाराचा आणि वर्चस्वाचा असणार आहे. तुम्ही करत असलेले काम मोठे होईल. विस्तार होईल. तुम्हाला एक महत्त्वाचा टप्पा गाठता येईल. बऱ्याच गोष्टींची सूत्रे तुमच्या हातात असतील. त्यामुळे तुम्हाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे. वडील किंवा मोठ्या आदरणीय व्यक्तींचा दबदबा राहील.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला स्वतः राजा आणि बाकीचे प्रजा अशी भावना येऊ शकते. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळावेल. पण याचे रुपांतर पोकळ डौलात तर होत नाही ना याची तुमची दक्षता बाळगायला हवी. अती विश्वास, अभिमान, गर्व हे तुम्हाला बाधक ठरु शकतात. म्हणून पाय जमिनीवर ठेवा. सामर्थ्यवान अशी सप्ताहाची सुरुवात करा.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे. तुम्ही एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचण्याची शक्यता आहे. मागे केलेल्या नियोजनाला आणि कष्टाला चांगले यश मिळेल. पण मार्गावर पुढे जाण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीची वाट बघावी लागेल. लोकांचं सहकार्य मिळेल. यात्रा किंवा प्रवास संभवतात.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही धैर्य आणि संयम ठेवण्याची गरज आहे. आहात त्या मार्गावर पुढे जाताना, विचारमंथन करा, इतरांचे मत जाणून घ्या. कामाचा विस्तार कसा करता येईल हा विचार करा. कोणत्याही परिस्थितीचा सगळ्या बाजूने विचार करा. तुम्ही आज जिथे पोचला आहात त्यात इतरांचा मोलाचा वाटा आहे याची जाणीव ठेवा.
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी स्थैर्य आणि दिलासा घेऊन येत आहे. तुम्ही तुमच्या कामात संथ पण सबळ वाटचाल करणार आहात. काही अडथळे किंवा अडचणी येऊ शकतात पण त्यातून तुम्ही आणखी मजबूत आणि सक्षम होणार आहात. प्रवास घडू शकतात. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील. पण फळ मात्र सावकाश मिळेल म्हणून संयम ठेवा!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही कृतिशील राहण्याची गरज आहे. तुमच्या कामात खूप कष्ट करा. जीव ओतून प्रामाणिक प्रयत्न करा. घाई न करता कोणतेही काम अधिक चांगले आणि परिपूर्ण कसे करता येईल याकडे लक्ष द्या. चिकाटीने काम केले तर उत्तम प्रगती होऊ शकेल. विश्वासाच्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकता.
श्रीस्वामी समर्थ.