Tarot Card: या सप्ताहात सकारात्मक घटनांचे संकेत; जाणून घ्या तुमचे टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:11 IST2025-02-08T12:09:42+5:302025-02-08T12:11:34+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. 

Tarot Card: Signs of positive events this week; Read your Tarot fortune! | Tarot Card: या सप्ताहात सकारात्मक घटनांचे संकेत; जाणून घ्या तुमचे टॅरो भविष्य!

Tarot Card: या सप्ताहात सकारात्मक घटनांचे संकेत; जाणून घ्या तुमचे टॅरो भविष्य!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
९ ते १६ फेब्रुवारी
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

नंबर १:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी जलद गतीचा आहे. तुमच्या कामात तुम्हाला नवीन संकल्पना सुचतील. थोडे मतभेद आणि वादविवाद देखील संभवतात पण एकुणात परिस्थीत चांगली राहील. इतरांसमोर तुमचं बुद्धीचातुर्य उठून दिसेल. तुम्हाला हवी असलेली बातमी मिळेल, किंवा हवी असलेली व्यक्ती भेटेल. एखादा प्रवास घडेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही अतिशय प्रामाणिकपणा जपण्याची गरज आहे. रोखठोक वागा, भावनांना बळी पडू नका. तुमचे मत स्पष्टपणे कोणालाही न घाबरता किंवा कुठलेही दडपण न घेता मांडा. नवीन बदल घडवू शकता. संवाद कौशल्यात सुधारणा करा. वादाच्या प्रसंगी संयम ठेवा. वाचन, लेखन, गायन, वादन यासारख्या गोष्टींत मन रमवा!

नंबर २:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. अडकलेले काम सुटेल. मोकळेपणाने तुमच्या भावना व्यक्त केल्या तर चांगला मार्ग निघेल. समस्या पूर्ण नाही सुटली तरी ती कशी सोडवता येईल याचा अंदाज येईल. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल. ताजे टवटवीत वाटेल!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बुद्धीपेक्षा मनाने काम करण्याची गरज आहे. तुमचं अंतर्मन काय सुचवत आहे, तुम्हाला आतून काय वाटत आहे ते ऐकण्याची गरज आहे. लोकांशी चांगले, सद्भावनांचे संबंध ठेवा. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या विषयात नवीन सुरुवात करा. कृतज्ञता बाळगा. एखाद्या कलेत वेळ घालवा!

नंबर ३:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी ठरणार आहे. अपेक्षित यश मिळण्याच्या मार्गावर आहे. जे काही करत आहात त्यातून चांगले निष्पन्न निघणार आहे. थोडा विलंब होऊ शकतो पण परिणाम चांगला मिळेल. या काळात स्त्रियांचे वर्चस्व राहील. भाग्याची साथ राहील. एखादी चांगली बातमी मिळेल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमचा खर्च सांभाळण्याची गरज आहे. उधळपट्टी बंद करुन पैशाचे नीट नियोजन करण्याची गरज आहे. विनाकारण कोणाबद्दल ही वाईट विचार करु नका. त्याचबरोबर स्वार्थी विचार न करता इतरांना देखील लागेल तशी मदत करण्याची गरज आहे. "आज जे पेराल तेच उद्या उगवेल" हे लक्षात ठेवा. त्यामुळे चांगल्या गोष्टीत गुंतवणूक करा.

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

Web Title: Tarot Card: Signs of positive events this week; Read your Tarot fortune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.