शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: एकूणच जूनचा शेवटचा आठवडा पांडुरंगाच्या कृपेने आनंददायी ठरणार, वाचा टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:38 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२२ ते २८ जून===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

या सप्ताहात एकच योजना, मने सांभाळा, जपा भावना!

नंबर १: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असणार आहे! एखाद्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. एखादी अपेक्षित घटना घडेल. मागच्या दुःखावर सुखाची फुंकर घालणारा हा काळ आहे. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कलेला प्रोत्साहन मिळेल. या सगळ्यात तुम्हाला समाधान वाटेल. "आज मैं ऊपर आसमां नीचे" असं म्हणावंसं वाटेल!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुमच्याकडून कळत नकळत स्वार्थी वागणूक होऊ शकते त्यामुळे ते लक्षपूर्वक टाळा. कुटुंबामध्ये एकोप्याने वागा. तुम्हाला आवडत असणाऱ्या गोष्टीसाठी वेळ काढा. इतरांची विचारपूस करा, सर्वांना तुमच्या आनंदात सहभागी करुन घ्या. कुठल्या नात्यात वितुष्ट आलं असेल तर ती कटुता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा!

नंबर २: (राशी वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी, तुम्ही आहात त्या मार्गावर पुढे नेणारा असणार आहे. बुध्दी पेक्षा भावनांचा पगडा राहील. मध्यम गतीने कामे पुढे सरकतील. लोकांचे सहकार्य लाभेल. उत्तम नातेसंबंध जोडले जातील. तुम्हाला आतून प्रसन्न वाटेल, दुसऱ्यांना तुम्ही आनंद देऊ शकाल. एखादा छंद किंवा कला यातून तुम्हाला समाधान मिळेल. प्रवास आनंद देईल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचा विचार करायचा आहे. इतरांना तुमच्या बरोबर घेऊन चाला. तुम्हाला कृतीशील होण्याची गरज आहे. तुमच्यातील चांगुलपणाने लोकांचे मन जिंका. पण कोणाच्या कुठल्याही आमिषाला भुलू नका. "मन जीता ते जग जीता" याप्रमाणे स्वतःचे आणि इतरांचे मन जिंकलात तर तुमचा खरा विजय होईल!

नंबर ३: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)

काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी सोबतीने पुढे वाढण्याचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. घरामध्ये जोडीदाराकडून अपेक्षित किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात साहचर्य मिळेल. दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील. प्रेम आणि नात्यांच्या बाबतीत आनंददायी घटना घडेल. साथ संगतीमुळे अवघड मार्ग सोपा होईल!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला एकटे राहण्यापेक्षा इतरांच्या सोबत राहणे जास्त फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे कुठल्याही बाबतीत एकटे पडू नका. तुमचे मत वेगळे असेल तरी चार लोकांच्या सांगण्याप्रमाणे वागा. एखाद्या कलेतून आनंद मिळवा. बुध्दीचा तर्क बाजूला ठेवून भावना समजून घ्या. जवळच्या व्यक्तीला तुमच्या भावना व्यक्त करुन सांगा!

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष