Tarot Card: नवीन वर्षाची आनंददायी सुरुवात, फक्त संयम ठेवा मनात; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:05 IST2025-03-29T18:04:41+5:302025-03-29T18:05:00+5:30
Tarot Card:टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुमचे साप्ताहिक भविष्य पाहू शकता.

Tarot Card: नवीन वर्षाची आनंददायी सुरुवात, फक्त संयम ठेवा मनात; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
३० मार्च ते ५ एप्रिल
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी वैचारिक गुंतागुंतीचा असणार आहे. अनेकविध विचारांनी मनावर परिणाम होऊ शकतो. निर्णय घेणं अवघड वाटू शकतं. तुम्ही ठरवलेल्या कामात किंवा तुम्ही आखलेल्या नियोजनात फार गती येणार नाही. गोष्टी हव्या तशा पुढे सरकणार नाहीत. अकारण विलंब होऊ शकतो पण हाच वेळ तुमच्या आत्मोन्नती साठी योग्य ठरेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही शांत बसून, तोलून मापून विचार करून पुढे जाण्याची गरज आहे. निर्णय घेताना बुद्धीने, सारासार विचार करून घ्या. भावनेच्या भरात किंवा कोणाच्या प्रभावाखाली येऊन काहीही करू नका. एकाग्रपणे काम करा. इतरांच्या सोबतीपेक्षा एकट्याने काम करा. नूतन वर्षाची सुरुवात ध्यान आणि उपासनेने केली तर उत्तम परिणाम मिळतील!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असणार आहे! एखाद्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. एखादी अपेक्षित घटना घडेल. मागच्या दुःखावर सुखाची फुंकर घालणारा हा काळ आहे. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कलेला प्रोत्साहन मिळेल. या सगळ्यात तुम्हाला समाधान वाटेल. "आज मैं ऊपर आसमां नीचे" असं म्हणावंसं वाटेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुमच्याकडून कळत नकळत स्वार्थी वागणूक होऊ शकते त्यामुळे ते लक्षपूर्वक टाळा. कुटुंबामध्ये एकोप्याने वागा. तुम्हाला आवडत असणाऱ्या गोष्टीसाठी वेळ काढा. इतरांची विचारपूस करा, सर्वांना तुमच्या आनंदात सहभागी करुन घ्या. या गुढी पाडव्याला कुठल्या नात्यात वितुष्ट आलं असेल तर ती कटुता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी मागे केलेल्या कामाचे चांगले फळ घेऊन येत आहे. तुमच्या कष्टाचं चीज होईल. लोकांकडून तुमचं कौतुक होण्याची शक्यता आहे. तुम्हाला हवं असलेलं नाव, हुद्दा, मान सन्मान, बक्षिस किंवा कौतुकाचे शब्द हे या सप्ताहात मिळू शकतात. एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल, काही प्रश्न सुटतील.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचे पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे. हुरळून जाऊ नका. लोकांना एकत्र घेऊन पुढे चाला. तुमच्या संघातील सगळ्यांना आधार द्या. एक आदर्श नेतृत्व करा. काही लोक तुमचा दुस्वास करू शकतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चाला. या पाडव्याला इतरांना निःस्वार्थ निरपेक्ष मदत करण्याची गुढी उभारा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.