Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:18 IST2025-10-25T10:18:02+5:302025-10-25T10:18:44+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून अथवा राशीनुसार साप्ताहिक भविष्य जाणून घेता येईल.

Tarot Card: कामात गुंतवून घ्या, आठवडा आनंदात जाईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १: (राशी- मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक सुख समृद्धी घेऊन येत आहे. तुम्हाला एखादे लहान ध्येय गाठता येईल. एखादी हवी असलेली वस्तू घेता येईल. आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी व्यवसायात एक महत्त्वाचा टप्पा येईल. अस्थिर परिस्थिती सुधारेल. एकंदरीत हा काळ अगदी पूर्ण नाही पण काही प्रमाणात यश देणार आहे!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या आर्थिक सक्षमतेने इतरांना मदत कशी करता येईल याचा विचार करा. संकुचित वृत्ती सोडा. मन मोठे करा. सगळ्यांना सामावून घ्या. तुमच्या वर्चस्वाचा गैरवापर करू नका. "न अहंकारात परो रिपु:" म्हणजे अहंकारासारखा दुसरा शत्रू नाही हे लक्षात ठेवा!
नंबर २: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना किंवा नवीन विचारांना चांगल्या प्रकारे गती देण्याचा असणार आहे. नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी अनुकूलता मिळेल. दोन किंवा जास्त गोष्टी हाताशी असतील. तुम्हाला ऊर्जा, सामर्थ्य आणि आत्मविश्वास मिळेल. ध्येय साधनात नियोजन होईल, त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल. प्रवास संभवतो.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायचं असेल तर नक्की करा. अतिविचार करण्यामध्ये वेळ घालवू नका. तुम्हाला आतून योग्य वाटत असलेला निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहून वाटचाल करा. कामामध्ये, घरामध्ये ऊर्जेने काम करा, उत्साह ठेवा. जे ठरवाल ते कृतीत आणा. तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे याची जाणीव ठेवा.
नंबर ३: (राशी वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी काही प्रमाणात मागे येण्याचा असणार आहे. एक प्रकारे माघार घ्यावी लागेल. तुम्हाला हवे तसे घडणार नाही. अपेक्षित यश मिळण्यात काहीतरी कमतरता राहील. तडजोड करावी लागेल. पण हे करत असताना कोणाची तरी चांगली साथ मिळू शकते. प्रयत्न करुन प्रगती होईल. प्रवास घडू शकतो.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला शांतपणे कामे करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तडकाफडकी बोलू नका आणि निर्णय ही घेऊ नका. मध्यम मार्ग निवडा. आत्ता माघार घ्यावी लागली तरी हा काळ तात्पुरता आहे हे लक्षात ठेवा. म्हणून स्वतःला त्रास करुन घेऊ नका. उलट आत्मचिंतन करा.
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.