Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 11:13 IST2025-09-13T11:12:16+5:302025-09-13T11:13:01+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून किंवा राशीनुसार तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: Even if you reach the peak of success, keep your feet on the ground, this is what the next week will teach you; Read your Tarot fortune! | Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१४ ते २० सप्टेंबर
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

नंबर १: (राशी : मिथुन/कन्या/धनू/मीन)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक सुख समृद्धी घेऊन येत आहे. तुम्हाला एखादे लहान ध्येय गाठता येईल. एखादी हवी असलेली वस्तू घेता येईल. आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी व्यवसायात एक महत्त्वाचा टप्पा येईल. अस्थिर परिस्थिती सुधारेल. एकंदरीत हा काळ अगदी पूर्ण नाही पण काही प्रमाणात यश देणार आहे! 

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या आर्थिक सक्षमतेने इतरांना मदत कशी करता येईल याचा विचार करा. संकुचित वृत्ती सोडा. मन मोठे करा. सगळ्यांना सामावून घ्या. तुमच्या वर्चस्वाचा गैरवापर करू नका. "न अहंकारात परो रिपु:" म्हणजे अहंकारासारखा दुसरा शत्रू नाही हे लक्षात ठेवा!

नंबर २: (राशी:  मेष/कर्क/तूळ/मकर)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी वेगवान असणार आहे. अडकलेली कामे पुढच्या टप्प्यापर्यंत पोचू शकतात. ध्येयाकडे चांगली वाटचाल होईल. सतत होत असलेल्या घडामोडींमुळे अस्थिर आणि अस्वस्थ वाटू शकतं. सडेतोड बोलणाऱ्या व्यक्तींशी सामना होईल. मतभेद होऊ शकतात. तुमच्या कामांना गती आणि प्रगती मिळेल. प्रवास संभवतो.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही धडाडीने आणि विश्वासाने पुढे चालण्याची गरज आहे. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा, रोखठोक वागा. सत्याचीच बाजू घ्या. बुद्धीचातुर्य वापरा. कोणत्याही बाबतीत वेळ गाठा, विलंब नको. संथ न होता, आहात त्या मार्गावर "तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची!" याप्रमाणे वागलात तर यश निश्चितपणे मिळेल! भांडण टाळा!

नंबर ३: (राशी: वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा आरामाचा असणार आहे. तुम्ही पूर्वी बरेच श्रम केले आहेत, आता तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. तुम्हाला तुमचा स्वतंत्र वेळ मिळेल, या निवांतपणात तुम्ही आत्मपरीक्षण करू शकाल. ही काळ तुमच्यासाठी निवांतपणा घेऊन येत आहे, त्यामुळे "आनंदी आनंद गडे" असा अनुभव तुम्हाला येईल!

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही स्वार्थ सोडून इतरांचा देखील विचार करण्याची गरज आहे. हा वेळ स्वतः मधे सुधारणा करण्यासाठी वापरा. जरी तुमच्याकडे चांगली संपन्नता असली तरी वस्तूंचा अतिरेक वापर करू नका. गरजेपुरताच वापर करा. आनंद उपभोगताना अत्यंत विनम्र रहा. दिखावेपणा करू नका!

संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.

Web Title: Tarot Card: Even if you reach the peak of success, keep your feet on the ground, this is what the next week will teach you; Read your Tarot fortune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.