Taro Card: दसऱ्याच्या मुहूर्तावर तीनांपैकी एक टॅरो कार्ड निवडा; भाग्योदय कसा आणि कधी ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 13:09 IST2023-10-21T13:08:38+5:302023-10-21T13:09:49+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या तीनांपैकी एक कार्ड निवडून तुम्ही साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता, देवीचे नाव घ्या आणि निवडा एकी कार्ड!

Taro Card: दसऱ्याच्या मुहूर्तावर तीनांपैकी एक टॅरो कार्ड निवडा; भाग्योदय कसा आणि कधी ते जाणून घ्या!
>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
22 ते 28 ऑक्टोबर
===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी वेगवान असणार आहे. खूप पटापट गोष्टी घडतील. अडकलेली कामे पुढच्या टप्प्यापर्यंत पोचू शकतात. ध्येयाकडे चांगली वाटचाल होईल. सतत काहीतरी हालचाल किंवा सतत कुठल्यातरी घडामोडी घडतील. त्यामुळे थोडं अस्थिर आणि अस्वस्थ वाटू शकतं. काही उद्धट किंवा सडेतोड बोलणाऱ्या व्यक्तींशी सामना होईल. एखादा वाद, मतभेद होऊ शकतात.
या आठवड्यात तुम्ही धडाडीने, विश्वासाने आणि प्रखरपणे पुढे चालण्याची गरज आहे. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा, रोखठोक वागा, मुळमुळीत राहू नका. पण असं करत असताना संबंध तोडू नका, किंवा दुसऱ्यांना दुखवू नका. सत्याचीच बाजू घ्या. बुद्धीचातुर्य वापरा. तुमचं तेच बरोबर आणि बाकी सगळ्यांचं सगळं चूक असं भाव ठेवू नका. वेळ गाठा, विलंब नको, जलद गतीने काम करा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी संसाधनांच प्राधान्य घेऊन येत आहे. तुम्ही वस्तू, पैसे, लोक, कौशल्य यांनी युक्त असाल. तुम्हाला तुमच्याकडील वस्तुंचा उपयोग करून प्रश्न सोडवावा लागेल. कामामध्ये लोकांकडून चांगला अभिप्राय मिळू शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाल. घराबाबत किंवा जमिनीबाबत, तुम्हाला चांगलं वाटेल अशी काही घटना घडेल.
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. सगळ्या वस्तू त्यांच्या क्षमतेप्रमाणे वापरा. आर्थिक नियोजन नीट करा. कुठे आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. लोकांना मदत करा, विशेष करून आर्थिक किंवा भौतिक मदत करा. सगळ्यांचा सांभाळ करा. भावनिक न होता, व्यावहारिक वागा, पण तुटक वागू नका. वागण्या बोलण्यात धैर्य आणि संयम ठेवा.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. नवीन भौतिक आनंद, सुख सोयी अनुभवता येतील. तुम्ही जे करत आहात, किंवा जे करण्याची इच्छा आहे, त्यामध्ये एक पाऊल पुढे वाढू शकता. अडकलेले काम सुटेल. कौटुंबिक सुख समृद्धी राहील. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल. घर, गाडी, नोकरी, व्यवसाय, जमिनीचे काम यासंदर्भात चांगली प्रगती होईल.
या आठवड्यात तुम्ही सावकाश आणि चिकाटीने काम करण्याची गरज आहे. भौतिक, आर्थिक, व्यावहारिक गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. त्यामध्ये नवीन सुरुवात करू शकता. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन योजना मांडा, सुरू करा. विनम्रपणे तुमचं कौशल्य दाखवा. नवीन काहीतरी शिकू शकता. कुठली नवीन सुरुवात करायची असेल तर करा, विशेष करून आर्थिक विषयात.
श्रीस्वामी समर्थ.