Tarot Card: शांततेने, संयमाने वागा, भविष्यात विजय तुमचाच आहे; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:55 IST2025-04-05T11:54:33+5:302025-04-05T11:55:16+5:30
Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: शांततेने, संयमाने वागा, भविष्यात विजय तुमचाच आहे; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
६ ते १२ एप्रिल
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी बुद्धीला आव्हान देणारा ठरेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. कामामध्ये नियोजन चांगले होईल. सक्षमतेने पुढे जाल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला तुमचे बोलणे स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" हे सिद्ध करुन दाखवा.
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे. तुम्ही एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचण्याची शक्यता आहे. मागे केलेल्या नियोजनाला आणि कष्टाला चांगले यश मिळेल. पण मार्गावर पुढे जाण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीची वाट बघावी लागेल. लोकांचं सहकार्य मिळेल. यात्रा किंवा प्रवास संभवतात.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही धैर्य आणि संयम ठेवण्याची गरज आहे. आहात त्या मार्गावर पुढे जाताना, विचारमंथन करा, इतरांचे मत जाणून घ्या. कामाचा विस्तार कसा करता येईल हा विचार करा. कोणत्याही परिस्थितीचा सगळ्या बाजूने विचार करा. तुम्ही आज जिथे पोचला आहात त्यात इतरांचा मोलाचा वाटा आहे याची जाणीव ठेवा.
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी धैर्य आणि संयमाचा कस लावणारा असणार आहे. तुमच्यातील चांगुलपणाची एक प्रकारे परीक्षा होईल. पण तुम्ही जर या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर पुढचा मार्ग निश्चितच सोपा होईल. या काळात तुम्हाला यश मिळवणे अवघड वाटेल. काहीतरी मिळवायला वाट बघावी लागेल. शरीरापेक्षा मनाचे बल महत्त्वपूर्ण ठरेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही नियमसंयम ठेवून वागलात तर तुम्हाला तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोचणे सोपे जाईल. वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा हा काळ आहे. राग लोभ मत्सर अशा तमोगुण प्रधान वृत्तीवर शुद्ध सात्विक शांत भावनेने मात करा. सौम्य शांततेचा मार्ग निवडणे म्हणजे सुध्दा एक प्रकारचे धाडसाचे काम आहे हे विसरु नका.
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.