साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १: (राशी: वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी चढाओढीचा असणार आहे. किरकोळ वादविवाद किंवा भांडणं होऊ शकतात. एखादी परीक्षा द्यायची वेळ येईल. अपेक्षित यश गाठण्यासाठी अडथळे येऊ शकतात. काही लोकांमुळे हातची संधी जाऊ शकते. नोकरी व्यवसायात तुमच्या मताला किंमत मिळण्यासाठी तुम्हाला बरीच धडपड करावी लागेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात इतरांवर पटकन विश्वास ठेवू नका. लोकांना काहीतरी पटवून देण्यापेक्षा त्यांना ते आपोआप पटेल असं करुन दाखवा. स्पर्धा आहे ती स्वीकारा आणि त्यात तुमचे प्रामाणिक प्रयत्न करा. तुम्ही मागे राहून किंवा हातपाय गाळून चालणार नाही, आलेल्या परिस्थितीशी दोन हात करा!
नंबर २: (राशी: मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या बुध्दीने काम करण्याचे प्रसंग घेऊन येत आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. कामामध्ये संकल्पना आखल्या जातील, नियोजन चांगले होईल. सक्षमतेने पुढे जात राहाल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमचे बोलणे स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" हे सिद्ध करुन दाखवा.
नंबर ३: (राशी :मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी भावभावनांचं प्राधान्य घेऊन येत आहे. तुम्ही मुख्यत्वे आनंदी राहणार आहात. तुम्हाला तुमच्या मनाचा कौल घेऊन इतर व्यवहारिक गोष्टींपेक्षा मन काय सांगत आहे त्याप्रमाणे वागून चांगला अनुभव येईल. कठीण परिस्थितीसुद्धा सकारात्मकतेने हाताळू शकाल. स्वतःमध्ये समाधानी रहाल. कला क्षेत्रात चांगली प्रगती होईल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही भावनांमध्ये वाहवत जात नाही आहात ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोणामध्येही भावनिक दृष्ट्या अडकू नका. तुम्हाला आवडणारा एखादा छंद किंवा एखादी कला आत्मसात करा, त्यात वेळ घालवा. इतरांना पूर्ण मदत करा. तुमच्या बोलण्याने इतरांना आधार मिळू शकतो त्याप्रमाणे वागा. कृतज्ञ रहा.
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.
Web Summary : This week's tarot guidance suggests a mixed bag. Taurus, Leo, Scorpio, Aquarius face challenges; Gemini, Virgo, Sagittarius, Pisces need clear communication; Aries, Cancer, Libra, Capricorn should balance emotions and creativity. Patience and gratitude are advised for all.
Web Summary : इस सप्ताह टैरो मार्गदर्शन मिश्रित फल देगा। वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ को चुनौती; मिथुन, कन्या, धनु, मीन को स्पष्ट संचार; मेष, कर्क, तुला, मकर को भावनाओं और रचनात्मकता का संतुलन बनाए रखना चाहिए। धैर्य और कृतज्ञता की सलाह दी जाती है।