Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:33 IST2025-06-07T12:32:40+5:302025-06-07T12:33:15+5:30
Tarot Card: दिलेल्या टॅरो कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
८ ते १४ जून
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============
नंबर १:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा असणार आहे! एखाद्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. एखादी अपेक्षित घटना घडेल. मागच्या दुःखावर सुखाची फुंकर घालणारा हा काळ आहे. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कलेला प्रोत्साहन मिळेल. या सगळ्यात तुम्हाला समाधान वाटेल. "आज मैं ऊपर आसमां नीचे" असं म्हणावंसं वाटेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुमच्याकडून कळत नकळत स्वार्थी वागणूक होऊ शकते त्यामुळे ते लक्षपूर्वक टाळा. कुटुंबामध्ये एकोप्याने वागा. तुम्हाला आवडत असणाऱ्या गोष्टीसाठी वेळ काढा. इतरांची विचारपूस करा, सर्वांना तुमच्या आनंदात सहभागी करुन घ्या. कुठल्या नात्यात वितुष्ट आलं असेल तर ती कटुता दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा!
नंबर २:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी, तुम्ही आहात त्या मार्गावर पुढे नेणारा असणार आहे. बुध्दीपेक्षा भावनांचा पगडा राहील. मध्यम गतीने काम पुढे सरकेल. लोकांचे सहकार्य लाभेल. उत्तम नातेसंबंध जोडले जातील. तुम्हाला आतून प्रसन्न वाटेल, दुसऱ्यांना तुम्ही आनंद देऊ शकाल. एखादा छंद किंवा कला यातून तुम्हाला समाधान मिळेल. प्रवास आनंद देईल.
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचा विचार करायचा आहे. इतरांना तुमच्या बरोबर घेऊन चाला. तुम्हाला कृतीशील होण्याची गरज आहे. तुमच्यातील चांगुलपणाने लोकांचे मन जिंका. पण कोणाच्या कुठल्याही आमिषाला भुलू नका. "मन जीता ते जग जीता" याप्रमाणे स्वतःचे आणि इतरांचे मन जिंकलात तर तुमचा खरा विजय होईल!
नंबर ३:
काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. अडकलेले काम सुटेल. मोकळेपणाने तुमच्या भावना व्यक्त केल्या तर चांगला मार्ग निघेल. समस्या पूर्ण नाही सुटली तरी ती कशी सोडवता येईल याचा अंदाज येईल. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल. ताजे टवटवीत वाटेल!
तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही बुद्धीपेक्षा मनाने काम करण्याची गरज आहे. तुमचं अंतर्मन काय सुचवत आहे, तुम्हाला आतून काय वाटत आहे ते ऐकण्याची गरज आहे. लोकांशी चांगले, सद्भावनांचे संबंध ठेवा. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या विषयात नवीन सुरुवात करा. कृतज्ञता बाळगा. एखाद्या कलेत वेळ घालवा!
संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.