Tarot Card: 'आकाशाला हात तरी पाय जमिनीवर' याची शिकवण देणारा काळ; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:34 IST2025-04-12T12:33:41+5:302025-04-12T12:34:01+5:30

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. 

Tarot Card: A time that teaches 'hands in the sky but feet on the ground'; Read the weekly tarot prediction! | Tarot Card: 'आकाशाला हात तरी पाय जमिनीवर' याची शिकवण देणारा काळ; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

Tarot Card: 'आकाशाला हात तरी पाय जमिनीवर' याची शिकवण देणारा काळ; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन
१३ ते १९ एप्रिल
===============
सुमेध रानडे,
टॅरो कार्ड रीडर, पुणे
===============

नंबर १:

काय घडू शकते? 
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना किंवा नवीन विचारांना चांगल्या प्रकारे गती देण्याचा असणार आहे. नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी अनुकूलता मिळेल. दोन किंवा जास्त गोष्टी हाताशी असतील. तुम्हाला ऊर्जा, सामर्थ्य आणि आत्मविश्वास मिळेल. ध्येय साधण्यात नियोजन करता येईल, त्याचा तुम्हाला पुढे फायदा होईल. प्रवास संभवतो.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायचं असेल तर नक्की करा. अतिविचार करण्यामध्ये वेळ घालवू नका. तुम्हाला आतून योग्य वाटत असलेला निर्णय घ्या आणि त्यावर ठाम राहून वाटचाल करा. कामामध्ये, घरामध्ये ऊर्जेने काम करा, उत्साह ठेवा. जे ठरवाल ते कृतीत आणा. तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे याची जाणीव ठेवा.

नंबर २:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक सुख समृद्धी घेऊन येत आहे. तुम्हाला एखादे लहान ध्येय गाठता येईल. एखादी हवी असलेली वस्तू घेता येईल. आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी व्यवसायात एक महत्त्वाचा टप्पा येईल. अस्थिर परिस्थिती सुधारेल. एकंदरीत हा काळ अगदी पूर्ण नाही पण काही प्रमाणात यश देणार आहे! 

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुमच्या आर्थिक सक्षमतेने इतरांना मदत कशी करता येईल याचा विचार करा. संकुचित वृत्ती सोडा. मन मोठे करा. सगळ्यांना सामावून घ्या. तुमच्या वर्चस्वाचा गैरवापर करू नका. "न अहंकारात परो रिपु:" म्हणजे अहंकारासारखा दुसरा शत्रू नाही हे लक्षात ठेवा!

नंबर ३:

काय घडू शकते?
हा सप्ताह तुमच्यासाठी अवघड परिस्थिती आणतो आहे. मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत. अपेक्षित यश मिळणार नाही. त्यामुळे काहीही करण्याची इच्छा कमी झालेली असेल. तुमचे विचारचक्र सुरु होईल आणि तुम्ही त्यात अडकण्याची शक्यता आहे. एक प्रकारची परीक्षा होईल. त्यात तुम्ही संयम आणि समतोल राखलात तर येणारा काळ चांगला जाईल.

तुम्ही काय करावे?
या आठवड्यात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरु करु नका. मोठे निर्णय घेऊ नका. अंगावर जबाबदारी ओढवून घेऊ नका पण स्वकर्तव्याला चुकू नका. इतरांच्या बोलण्याने, इतरांच्या वागण्याने स्वतःला त्रास करुन घेऊ नका. त्याने तुमचा वेळ आणि शक्ती वाया जाईल. मनाप्रमाणे काही घडले नाही तरी सुद्धा तुम्ही सकारात्मक राहून या काळातून तरून जाणे गरजेचे आहे.

संपर्क : ९५६१०९३७४०
श्रीस्वामी समर्थ.

Web Title: Tarot Card: A time that teaches 'hands in the sky but feet on the ground'; Read the weekly tarot prediction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.