शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 15:35 IST

Swami Vivekananda Spiritual Experience: गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या कृपेने स्वामी विवेकानंदांना महाकालीचे दर्शन झाले तेव्हा त्यांनी काय मागितले आणि त्यांना ते कसे मिळाले, ते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

आपण देवाकडे सतत काही ना काही मागत असतो, पण देव खरच प्रगट झाला आणि माग म्हणाला, तर त्या क्षणी नेमके काय मागायला हवे ते स्वामी विवेकानंद यांच्याकडून शिकायला हवे. आज त्यांची पुण्यतिथि, त्यानिमित्त त्याच्या चरित्र भागातील हा संदर्भ आपल्यासमोर आदर्श राहण्यासाठी!

भगवान ज्यांना ज्यांना आजपर्यंत भेटले म्हणजे ज्यांना त्यांनी दर्शन दिले आहे, त्या सर्व भक्तांचे लक्षण हे आहे, की ते स्वत: परमेश्वराची उपासना करत राहिले. उदा. रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांशी प्रत्यक्ष जगदंबा बोलत होती. म्हणून काही त्यांनी मूर्तीपूजा सोडली नाही. तसेच त्या मूर्तीला मान देणे सोडले नाही. उलट ती जगदंबा त्या मूर्तीतून प्रगट होत होती हे जेव्हा रामकृष्णांच्या लक्षात आले, तेव्हा ते जगदंबेच्या त्या मूर्तीची अधिक भक्ती भावाने पूजा करू लागले.  ते कधी जगदंबा, जगदंबा तर कधी आई आई म्हणून ओरडत असत. रडत असत. यावरून भगवंताच्या मूर्ती किती श्रेष्ठ असतात, हे त्यांनी विवेकानंदांनाही पटवून दिले. 

स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!

एकदा स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे गेले होते. गेल्यानंतर समोर बसले आणि त्यांनी विचारले, `तुम्ही देव पाहिला का हो?' ते म्हणाले `हो.' त्यावर स्वामींचा प्रतिप्रश्न, `देव कसा दिसतो?' परमहंस म्हणाले, `ते तुला सांगता यायचे नाही. पण तुला देव पहायचा असेल, तर मी तुला दाखवतो. मी देव पाहिलेला आहे. ज्यातून मी देव पाहिलेला आहे त्या देवाकडे तू जातोस का?' 

असे म्हणत परमहंसांनी स्वामींना आतल्या खोलीच्या दिशेने बोट करत म्हटले, `जा आत, तिथे जगदंबा बसली आहे. दर्शन घेऊन ये. विवेकानंद उठले, आत गेले व बऱ्याच वेळाने बाहेर आले. परमहंसांनी उत्सुकतेने विचारले, `दिसली का देवी? देवीकडे काय मागितले? विवेकानंद म्हणाले, `मी देवीकडे ज्ञान, तेज आणि वैराग्य मागितले.'

परमहंस म्हणाले, `कधी नव्हे ते देवीने दर्शन दिले आणि तू तिच्याकडे वैराग्य मागून आलास? परत जा आणि देवीकडे धन, संपत्ती, वैभव, प्रसिद्धी मागून घे.'विवेकानंद पुन्हा आत गेले आणि आशीर्वाद घेऊन बाहेर आले. या खेपेतही आपण आधीसारखेच मागितले. या घटनेवरून विवेकानंदांनी अनुमान काढले व परमहंसांना म्हणाले, `मूर्ती दिसायला साधी असली, तरी त्यात देवीचे वास्तव्य आहे. हे वास्तव्य प्रत्येक मूर्तीत असते. परंतु ते जाणवण्यासाठी सत्संग घडावा लागतो आणि देवाला पाहण्यासाठी गुरुकृपा व्हावी लागते. म्हणून संत म्हणत असत, 

देव देखिला देखिला, गुरुकृपे ओळखिला!

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदDeathमृत्यूspiritualअध्यात्मिक