Swami Samartha: 'स्वामी' नामाचा संकल्प: जो पूर्ण होण्याआधीच आधीच येते प्रचिती? जाणून घ्या पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:51 IST2026-01-29T14:50:47+5:302026-01-29T14:51:57+5:30
Swami Samartha: स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये जेव्हा एखादा भक्त स्वतःवर ठराविक कालावधीचे बंधन घालून, नामस्मरण करतो, तेव्हा स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते.

Swami Samartha: 'स्वामी' नामाचा संकल्प: जो पूर्ण होण्याआधीच आधीच येते प्रचिती? जाणून घ्या पद्धत
स्वामी समर्थांच्या मार्गात श्रद्धेला कृतीची जोड दिली की प्रचिती येतेच. अनेक भक्त आपल्या अडचणींच्या निवारणासाठी किंवा मनोकामना पूर्तीसाठी 'स्वामी नावाचा संकल्प' करतात. हा संकल्प म्हणजे केवळ जप नसून, ते स्वामींना दिलेले एक वचन असते.
Astro Tips: केवळ कष्ट पुरेसे नाहीत! भाग्याची साथ मिळवण्यासाठी करा 'हे' ३ साधे उपाय
संकल्प म्हणजे काय?
संकल्प म्हणजे स्वतःवर घालून घेतलेले एक आध्यात्मिक बंधन. यात आपण ठराविक दिवसांत (उदा. ११, २१, ४१ किंवा १०८ दिवस) स्वामींच्या नावाचा ठराविक जप (उदा. दररोज ११ माळा किंवा एकूण १ लाख जप) पूर्ण करण्याचे स्वामींसमोर जाहीर करतो. यात संख्या महत्त्वाची नसून सातत्य महत्त्वाचे आहे. तुमच्या साधनेत खंड पडत नाहीये ना, याची स्वामी परीक्षा घेतात आणि तुम्ही त्यात उत्तीर्ण झालात की फळही देतात.
स्वामी नावाचा संकल्प करण्याची पद्धत:
१. शुभ मुहूर्त: संकल्पाची सुरुवात शक्यतो गुरुवार, स्वामी प्रकट दिन किंवा कोणत्याही शुभ तिथीला करावी.
२. पूजा मांडणी: सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वामींच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी.
३. संकल्प सोडणे: हातामध्ये थोडे पाणी, अक्षता आणि फूल घेऊन स्वामींना सांगावे: "हे स्वामीराया, मी माझ्या [तुमची अडचण/मनोकामना सांगावी] कार्यासाठी आजपासून पुढील [दिवसांची संख्या] दिवसांपर्यंत दररोज [जप माळ संख्या] जप करण्याचा संकल्प करत आहे. हा विना अडथळा पूर्ण करण्याची शक्ती मला द्या." त्यानंतर ते पाणी स्वामींच्या चरणापाशी सोडावे.
४. जपाचे नियम: ठरवलेला जप रोज त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी बसून केल्यास त्याचे फळ अधिक मिळते. जपासाठी तुळशीची किंवा चंदनाची माळ वापरावी.
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींशी लग्न होणे हे 'लॉटरी' लागण्यासारखेच!
संकल्पाने होणारे लाभ:
मनोरथ पूर्ण होणे: भक्तांचा असा अनुभव आहे की, जर संकल्प शुद्ध भावनेने केला असेल, तर तो पूर्ण होण्यापूर्वीच स्वामी आपल्या अडचणी दूर करतात आणि मार्ग दाखवतात.
आत्मिक बळ: ठराविक कालावधीचे बंधन स्वतःवर घेतल्यामुळे शिस्त लागते आणि इच्छाशक्ती (Will Power) वाढते.
नकारात्मकतेचा नाश: घरामध्ये सातत्याने स्वामी नामाचा जप झाल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख-शांती नांदते.
अशक्य गोष्टी शक्य होतात: "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" या उक्तीप्रमाणे, संकटाच्या वेळी स्वामी स्वतः आपल्या पाठीशी उभे राहतात.
भीष्म द्वादशी आणि जया एकादशीचा दुर्मिळ योगावर भीष्माचार्यानीं दिलेल्या 'या' महामंत्राचे करा पठण
भक्तांसाठी विशेष टिप:
संकल्प करताना मनात शंका न ठेवता पूर्ण शरणागतीने स्वामींना आळवावे. स्वामींना संख्या नको, तर भाव हवा असतो. 'अनायासेन मरणं' असो वा संकटातून सुटका, स्वामी भक्ताची हाक कधीच रिकामी जाऊ देत नाहीत.