Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:51 IST2025-11-12T16:49:09+5:302025-11-12T16:51:32+5:30
Swami Samartha: आपण रोज देवपूजा करतो, पण मनात असंख्य विचार सुरु असल्याने हातून एखादा अपघात घडतो, अशा वेळी स्वामींना काय सांगावे, ते पाहा.

Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
काच तडकणे, निरांजन विझणे, मांजर आडवी जाणे, कुत्रा रडणे, अशा अनंत गोष्टींचा अर्थ माणूस ह्या अशुभ गोष्टीच आहेत असे मानून मनाला लावून घेतो आणि मग त्याही मनात घर करून राहतात. वास्तविक ह्याची दुसरी बाजूही असू शकते. कित्येक वेळा मांजर आडवी गेल्यावरही ज्या कामासाठी आपण जात आहोत ते काम झाल्याचा अनुभव येतो. त्याचप्रमाणे दिवा लावताना विझणे, पडणे, मालवणे याचा संबंध थेट जीवन मृत्यूशी जोडावा का? जाणून घेऊ.
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
काच कुणाच्याही हातून फुटू शकते. काचेच्या दुकानात कितीतरी काचा रोज तुटतात, फुटतात, तरी त्याचा व्यवसायावर परिणाम होत नाही. मग, अनावधानाने झालेल्या अपघाताला आपण स्वतःला दोषी का धरावे? किंवा मनात वाईट विचार का आणावेत?
'आम्ही कुणाचे खातो रे? राम आम्हाला देतो रे', ही अढळ श्रद्धा हवी. स्वामी पाठीशी असताना कोणी आपले का वाईट करेल? एवढी आपली कमकुवत श्रद्धा आहे का? हे स्वतःला विचारायला हवे. आपण कितीही काहीही केले तरी आपण त्यांना आणि स्वतःलाही फसवू शकत नाही हे नक्की. जर आपण प्रामाणिक असू तर भीती कसली? लहान सहान गोष्टीत सुद्धा आपले मन जपणारे आपले महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत. लक्षात ठेवा, काचेला तडा गेला तरी हरकत नाही, पण श्रद्धेला तडा जाता कामा नये.
महाराजांच्या भक्तांनी घाबरून कसे चालेल? ते समर्थ आहेत आपल्याला सांभाळायला! नको ते विचार मनात आणणे किंवा एखाद्या घटनेचा नकारात्मक अर्थ लावणे म्हणजे त्यांचा अपमान आहे आणि त्यांच्या प्रती आपल्या असलेल्या श्रद्धा, भक्तीवर आपणच प्रश्न निर्माण करण्यासारखे आहे. अशा वेळी स्वामींसमोर उभे राहून स्वतःची आधी समजून घालावी, 'नि:शंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे!'
त्यांचा हात घट्ट धरून, त्यांनीही आपला हात कधीच सोडू नये अशी प्रार्थना करावी, जेणेकरून मनात शंका, कुशंका न राहता त्यांच्या साक्षीने, कृपाशीर्वादाने सगळे काही शुभच होईल, याची खात्री बाळगा!
संपर्क : asmitadixit50@gmail.com