शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ तारक मंत्र: संकल्पाची 'ही' पद्धत बदलू शकते तुमचे संपूर्ण आयुष्य; गुरुवारी करा सुरुवात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:42 IST

Swami Samartha: तारक मंत्राच्या 'या' संकल्पातून उघडा स्वामीकृपेचे द्वार; लक्षात ठेवा...अशक्य ही शक्य करतील स्वामी! 

श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा संकल्प हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ते 'स्वतःकडून स्वतःला' दिलेलं एक वचन आहे. जेव्हा आपण कोणत्याही कार्यात संकल्पाची जोड देतो, तेव्हा आपल्या अठ्ठावीस कोटी पेशी आणि विश्वातील दैवी ऊर्जा एकाच ध्येयासाठी काम करू लागतात. हा सिद्ध मंत्र संकल्पात कसा परावर्तित करावा ते पाहू. 

फाल्गुन मास: शिशिराचा निरोप आणि चैतन्याची चाहूल! जाणून घ्या या महिन्याचे विशेष महत्त्व

''अशक्य ही शक्य करतील स्वामी..." या ओळी आपण अनेकदा ऐकतो, पण हे अनुभवण्यासाठी गरज असते ती एका दृढ संकल्पाची. संकल्प म्हणजे मनाची ती अवस्था जिथे आपण गोंधळलेल्या मन:स्थितीतून बाहेर येऊन एका ध्येयावर स्थिर होतो. यासाठी नेहमी आपल्या प्रार्थनेत असणारा तारक मंत्र संकल्प स्वरूपात म्हणायचा आहे. म्हणजे नेमका कसा? तर पुढील विधी जाणून घ्या. 

संकल्पाचा मुहूर्त: सुरुवात कशी करावी?

कोणत्याही मोठ्या कार्याची सुरुवात ही 'शुभेच्छे'ने व्हावी. स्वामींचे कार्य असल्याने गुरुवार हा सर्वात सर्वोत्तम दिवस आहे. त्याशिवाय पौर्णिमा किंवा संकष्टी यांसारख्या शुभ तिथीला, सण, उत्सवालाही तुम्ही सुरुवात करू शकता.

वेळ: पहाटेची वेळ (सकाळी ४ ते ६) ही 'अमृतवेळ' मानली जाते. या काळात वातावरणात सात्त्विकता जास्त असते. तेव्हा शक्य नसेल तर संध्याकाळी दिवेलागणीला शांत चित्ताने बसून सुरुवात करावी.

जागा: जिथे स्वामींचा वास आहे, असे तुमचे घरचे देवघर किंवा घरातला कोणताही शांत कोपरा. समोर स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा असेल तर उत्तम!

Vastu Shastra: झाडू कधी खरेदी करावा? कुठे ठेवावा? लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून, पाहा काय सांगते वास्तूशास्त्र!

संकल्पाची विधीवत कृती

संकल्प करताना पंचमहाभूतांपैकी 'पाणी' हे महत्त्वाचे माध्यम मानले गेले आहे, कारण ते स्मृती साठवून ठेवते.

१. स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावून शांत चित्ताने बसा.२. उजव्या हाताच्या तळव्यावर थोडे पाणी, अक्षता (तांदूळ) आणि एक फूल घ्या.३. आता डोळे मिटून पूर्ण श्रद्धेने म्हणा:

"मी (तुमचे नाव), स्वामींच्या साक्षीने आज संकल्प करत आहे की, माझ्या (इच्छा/शांती) साठी मी पुढील (दिवस - २१/४१/१०८) रोज (संख्या - ११/२१) वेळा तारक मंत्राचे पठण करेन. स्वामी, माझे हे व्रत पूर्ण करून घ्या."४. हे बोलून झाल्यावर हातातील पाणी ताम्हनात सोडा.

February Grahan 2026: १५ दिवसांत दोन मोठी ग्रहणं! दुर्मिळ योग; चुकूनही करू नका 'या' चुका!

संकल्पामागील शास्त्र (The Science of Intention)

संकल्प हा केवळ मंत्रपठण नाही, तर त्याचे तीन विज्ञानाधारित फायदे आहेत:

मानसिक शिस्त: संकल्पाने मेंदूतील 'प्री-फ्रंटल कॉर्टेक्स' (Pre-frontal Cortex) सक्रिय होतो. यामुळे आपली निर्णयक्षमता वाढते.

ध्वनी लहरी (Frequency): ठराविक लहरीत मंत्र म्हटल्याने आपल्या शरीराभोवती एक संरक्षक कवच (Aura) तयार होतो, जो नकारात्मक ऊर्जेला रोखतो.

RAS सिस्टम: जेव्हा आपण संकल्प करतो, तेव्हा मेंदूतील 'रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम' सक्रिय होते. यामुळे तुमच्या ध्येयाला पूरक असणाऱ्या संधी तुम्हाला निसर्गातून आपोआप दिसू लागतात.

Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात नशिबाचे धनी; आयुष्यभर लाभतं अमाप सुख-समाधान!

यशासाठी पाळायची नियमावली (Discipline)

१. वेळ पाळा: निसर्गाला 'लय' (Rhythm) आवडते. रोज एकाच वेळी मंत्र म्हटल्याने त्याचे फळ लवकर मिळते.२. सात्त्विक भाव: केवळ अन्नाने नाही, तर विचारांनीही सात्त्विक राहा. कोणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नका.३. मौन आणि ध्यान: जप संपल्यावर लगेच उठू नका. किमान २ मिनिटे डोळे मिटून शांत बसा. निर्माण झालेली ऊर्जा अंगात मुरू द्या.

महत्त्वाची टीप: स्त्रियांसाठी मासिक धर्म किंवा घरात सुतक अशा काळात प्रत्यक्ष विधी करू नका, पण स्वामींचा 'मानसिक जप' चालू ठेवा. स्वामींना बाह्य उपचारांपेक्षा अंतर्मनातील भाव जास्त प्रिय असतात हे लक्षात ठेवा आणि अशौच काळ पूर्ण झाल्यावर नव्याने संकल्प सुरु करा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Swami Samarth Tarak Mantra: Resolution method for life transformation, start Thursday!

Web Summary : Transform your life with the Swami Samarth Tarak Mantra. Begin on Thursday, making a resolution with water, chanting the mantra with devotion. Follow disciplines like maintaining timing, purity, and silence for success. Women should continue mental chanting during periods and restart the ritual afterward.
टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीspiritualअध्यात्मिक