आजपासून माघस्नानारंभ: जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:28 PM2022-01-17T14:28:10+5:302022-01-17T14:28:30+5:30

आपले पूर्वज तर ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने प्रात:स्नान करत. व्यायाम करत. सूर्यनमस्कार घालत आणि सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असत. माघस्नानाच्या निमित्ताने काशी, प्रयाग अशा पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करत असत. 

Start Magh month bathing from today: Know its importance and benefits! | आजपासून माघस्नानारंभ: जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि लाभ!

आजपासून माघस्नानारंभ: जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि लाभ!

Next

माघस्नानाच्या तिथीबद्दल मतभेद असले तरीही पौष पौर्णिमेला माघस्नानाला प्रारंभ करून माघ पौर्णिमेला त्यची समाप्ती करण्याची प्रथा प्रचलित आहे. ज्यांना संपूर्ण महिनाभर सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे शक्य नसेल, त्यांनी निदान महिन्याभरातून एकदा, दोनदा किंवा तिनदा तरी हे स्नान करावे. आपण म्हणाल, त्यात शक्य नसण्यासारखे काय? तर माघ स्नानाची महत्त्वाची अट म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून स्नान तर करायचेच, पण ते थंड पाण्याने करायचे! वाचूनच हुडहुडी भरली ना? म्हणूनच शास्त्राने हा पर्याय दिला असावा. 

आपले पूर्वज तर ब्रह्ममुहूर्तावर उठून थंड पाण्याने प्रात:स्नान करत. व्यायाम करत. सूर्यनमस्कार घालत आणि सूर्योदय झाल्यावर सूर्याला अर्घ्य देत असत. माघस्नानाच्या निमित्ताने काशी, प्रयाग अशा पुण्यक्षेत्री जाऊन स्नान करत असत. 

हा स्नान महिमा वाचल्यावर आपण त्यांच्या तुलनेत किती आळशी आहोत याची आपल्याला कल्पना येईल. हिवाळ्याचे थंडीचे दिवस व्यायामासाठी अनुकूल मानले जातात. वातावरण आल्हाददयाक असते. पण ते पाहण्यासाठी अंथरुण सोडून निसर्गाचे दर्शन घ्यावे लागते. ही सवय अंगी बाणली, तर त्याचे आपल्याला असंख्य लाभ होतात. शारीरिक आणि मानसिकही! तना मनाची मरगळ निघून जाते. नैराश्य पळून जाते. नवीन उत्साह संचारतो आणि सकाळची ऊर्जा दिवसभर पुरते. 

हे सगळे फायदे माहित असूनही आपण सूर्योदयापूर्वी उठायचे सोडून आठ-नऊ-दहा वाजता उठतो. म्हणून शास्त्रकारांनी हा नियम घालून दिला आहे, तो म्हणजे माघस्नानाचा! माघ पौर्णिमेपर्यंत थंडी पळून जाते. महिनाभरात सराव होतो आणि लवकर उठायची सवय लागते. यात सातत्य यावे याकरीता माघस्नान महत्त्वाचे मानले जाते. त्या नियमाला धार्मिक अधिष्ठान मिळावे म्हणून माघस्नानाचा संबंध पुण्यप्राप्तीशी जोडलेला आहे. जो सूर्यपूजा करतो, त्याची जग पूजा करते. यात असत्य काहीच नाही. यशस्वी लोकांचे चरित्र पाहिले, तर लक्षात येईल की सगळ्या यशस्वी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठत असत. या ब्रह्ममुहूर्ताचा सदुपयोग करून आपणही आपल्या जीवनाचा विकास करावा, यासाठी आपणही माघस्नानाचा संकल्प करूया आणि सूर्याला वंदन करून आपल्या कर्तृत्त्वाचे तेज समाजात निर्माण करूया!

Web Title: Start Magh month bathing from today: Know its importance and benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.