Soul Science: मी श्रीमंत घरात का जन्माला आलो नाही? मनाला सलणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:57 IST2026-03-05T15:56:21+5:302026-03-05T15:57:09+5:30
Soul Science: आपण जन्माला कुठे येणार हे केवळ योगायोगावर अवलंबून नसते तर त्यामागे दडले आहे सोल सायन्सचे गुपित; नक्की वाचा

Soul Science: मी श्रीमंत घरात का जन्माला आलो नाही? मनाला सलणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर मिळवा!
आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी हा विचार येतोच की, "देवाने मला याच घरात का पाठवलं?" किंवा "मी एखाद्या श्रीमंताच्या पोटी का नाही जन्माला आलो?" आपण अनेकदा आपल्या परिस्थितीला किंवा नशिबाला दोष देतो. पण अध्यात्म आणि 'सोल सायन्स' (Soul Science) एक खूप वेगळी आणि मनाला उत्तर देणारी गोष्ट सांगतं.
"माझ्याच नशिबात हा संघर्ष का?" हा प्रश्न विचारण्यापूर्वी एक क्षण थांबा. कल्पना करा की, तुमचा जन्म होण्यापूर्वी तुम्ही एका अशा ठिकाणी होतात, जिथे तुमचा आत्मा अगदी स्वतंत्र होता. तिथे तुम्हीच ठरवलं की, "यावेळी मला पृथ्वीवर जाऊन 'हे' धडे शिकायचे आहेत." हे ऐकायला थोडं अजब वाटेल, पण त्यामागची कारणं खूप सखोल आहेत.
१. श्रीमंत घर का नाही?
एखाद्याला गणितात हुशार व्हायचं असेल, तर तो सोपी उदाहरणं सोडून प्रगती करू शकत नाही; त्याला अवघड गणितं सोडवावीच लागतात. तसंच, तुमच्या आत्म्याला जर 'जिद्द', 'कष्ट' आणि 'स्वावलंबन' हे गुण शिकायचे असतील, तर तो श्रीमंत घराऐवजी अशा घराची निवड करतो जिथे त्याला प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत करावी लागेल. श्रीमंतीत कदाचित सुख सोयी मिळतील, पण 'शून्यातून विश्व निर्माण करण्याचा' आनंद मिळणार नाही. तुमचा आत्मा ही 'ट्रेकिंग'ची संधी निवडतो, 'रिसॉर्ट'मध्ये राहण्याची नाही!
२. 'गरज' विरुद्ध 'आवड'
आपण कपडे निवडताना आपल्याला 'आवडतात' ते घेतो, पण आत्मा कुटुंब निवडताना त्याला ज्याची 'गरज' आहे ते निवडतो. जर एखाद्याला 'क्षमा करायला' शिकायचं असेल, तर तो मुद्दाम अशा पालकांची निवड करेल जे कदाचित स्वभावाने थोडे कठीण आहेत. कारण जेव्हा समोरून त्रास होतो, तेव्हाच तर 'क्षमा' करण्याचा गुण विकसित होतो. म्हणजेच, तुमची आजची परिस्थिती ही तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला 'घडवण्यासाठी' आहे.
६ मार्च विशेष योग: पर्समध्ये ठेवा 'हे' पान; पैशाला पैसा जोडला जाईल आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या थांबतील!
३. कर्माचे जुने ऋणानुबंध
असं म्हणतात की, आपण त्याच लोकांशी जोडले जातो ज्यांच्याशी आपलं काहीतरी 'देणं-घेणं' बाकी आहे. ज्या व्यक्तीने मागच्या जन्मात आपल्याला मदत केली, कदाचित या जन्मात आपण तिची सेवा करण्यासाठी तिच्या पोटी जन्माला येतो. ही नाती म्हणजे एकमेकांना पूर्ण करण्याची एक संधी असते.
४. तुमच्या आत्म्याचा 'सिलेबस'
प्रत्येक जन्माचा एक सिलॅबस असतो. कोणाला 'प्रेम' शिकायचं असतं, तर कोणाला 'तटस्थ' राहायला. तुमचं सामान्य कुटुंब हे तुमच्यासाठी एक सर्वोत्तम 'शाळा' आहे. इथे मिळणारा प्रत्येक अनुभव—मग तो पैशांची चणचण असो किंवा नात्यांमधील ओढाताण—हा तुमच्या आत्म्याला अधिक प्रगल्भ आणि अनुभवी बनवण्यासाठी डिझाइन केलेला असतो.
यातून काय शिकायचं?
जेव्हा आपण हे स्वीकारतो की, "हे कुटुंब मीच निवडलंय," तेव्हा आपल्या मनातील तक्रार संपते आणि आपण परिस्थितीशी लढायला तयार होतो. तुम्ही श्रीमंत घरात नाही, तर एका सामान्य घरात आहात याचा अर्थ असा की, तुमचा आत्मा खूप 'बॅडमिंटन' खेळायला नाही, तर 'कुस्ती' खेळायला उतरला आहे! आणि कुस्ती खेळणाराच शेवटी पैलवान (Legend) ठरतो.