शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

Sita Navami 2023: संतती प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी २९ एप्रिल रोजी करावे सीता नवमीचे व्रत; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 11:56 IST

Sita Navami 2023: प्रत्येक विवाहित दाम्पत्याला संतती प्राप्तीची आस असते, अशांनी औषधोपचाराला उपासनेचेही बळ दिले पाहिजे हे सांगणारे सीता नवमीचे व्रत!

दरवर्षी वैशाख शुक्ल नवमी ही सीता नवमी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सीता माई राजा जनकाला मिळाली आणि त्यांनी तिला आपली कन्या म्हणून स्वीकारली, तोच हा दिवस!

हिंदू कॅलेंडरनुसार, सीता नवमी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा २९ एप्रिल रोजी ही तिथी येत आहे. या दिवशी सीता माई जनक राजाला सापडली. त्यामुळे ही तिथी सीता नवमी तसेच जानकी नवमी म्हणून ओळखली जाते. संतानप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी या दिवशी दानधर्म करावा . तसेच आजच्या दिवशी उपास केल्याने सोळा मोठ्या दानांचे फळ मिळते असे सांगितले जाते. चला जाणून घेऊया सीता नवमी का साजरी केली जाते आणि माता सीतेशी संबंधित पौराणिक कथा काय आहे?

भगवान रामाला विष्णूचा अवतार मानले जाते. तसेच माता सीतेला लक्ष्मीचा अवतार मानले जाते. वाल्मिकी रामायणात सीता माता पृथ्वीवर अवतरल्याचा उल्लेख आहे. एवढेच नाही तर भूमिकन्या सीता अशीही तिची ओळख आहे. कथा अशी आहे, की मिथिला देशात एकदा भीषण दुष्काळ पडला होता. जनक हा त्या नगरीचा राजा होता. दुष्काळामुळे मिथिलेचे लोक उपासमारीने मरू लागले. हे पाहून राजा जनक अस्वस्थ झाला.

त्यांनी एका महान ऋषींना या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा उपाय विचारला. ऋषींनी राजा जनकाला यज्ञ करण्यास व यज्ञभूमी नांगरण्यास सांगितले. जनकाने त्यांची आज्ञा प्रमाण मानून यज्ञाची पूर्ण तयारी केली आणि यज्ञ भूमी नांगरण्यास सुरुवात केली. त्यावेळेस नांगराचे टोक जमिनीत गेल्यावर काहीतरी वाजल्याचा आवाज आला. जनकाने माती बाजूला केली तर तिथे जमिनीतून एक आकर्षक पेटी बाहेर काढली. राजाने पेटी उघडली तेव्हा त्यात एक नवजात मुलगी दिसली. राजा जनकाला मूलबाळ नव्हते. संतती होण्यासाठी त्याने अनेक नवसायास केले होते. त्या गोंडस बालिकेला आपण दत्तक घ्यावे असा मनोदय जनकाने ऋषींजवळ व्यक्त केला. ऋषींनीदेखील हा दैवी प्रसाद आहे असे समजून तिचे पालन कर असे सांगितले व आशीर्वाद दिला. 

नांगराने नांगरलेल्या जमिनीला सीता म्हणतात, व ही बालिका अशाच नांगरलेल्या जमिनीतून मिळाली, म्हणून राजा जनकाने मुलीचे नाव सीता ठेवले. तसेच जनकाची कन्या अशी ओळख मिळाल्याने ती जानकी म्हणूनही ओळखली जाऊ लागली. मिथिलेची राजकुमारी म्हणून मिथिला असेही नाव तिला मिळाले. मात्र सीता हे नाव रूढार्थाने लौकिक पावले. तीच सीता पुढे श्रीरामाची पत्नी झाली. 

काही पौराणिक कथांमध्ये, सीता ही लंकापती रावण आणि मंदोदरीची कन्या होती, जी तिच्या मागील जन्मात वेदवती म्हणून ओळखली जात असे, असेही म्हटले जाते. 

सीतेच्या आगमनाने मिथिलेवरील दुष्काळाचे संकट टळले, देशात पुनश्च शांती, समृद्धी, सुबत्ता प्रस्थापित झाली म्हणून जनकाने अनेक सोळा प्रकारचे दान धर्म केले आणि संतती प्राप्तीचा आनंद व्यक्त केला. आपणही या दिवशी यथाशक्ती दान करू शकलो तर उत्तमच आहे. परंतु ते शक्य नसेल तर निदान उपास करावा, जेणेकरून सोळा प्रकारच्या मोठ्या दानाचे पुण्य लाभते असे शास्त्रात म्हटले आहे. तसेच जनक राजाप्रमाणे ज्या दाम्पत्यांची संतान प्राप्तीची इच्छा असते ती राम सीतेच्या आशीर्वादाने पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे!

टॅग्स :ramayanरामायण