शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
2
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
3
USA vs IRE : पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील भवितव्य आज ठरणार; अमेरिकेच्या हाती सर्वकाही
4
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
5
Suryakumar Yadav and Devisha Shetty PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती
6
विशेष लेख : ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती?
7
Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?
8
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
9
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
10
भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र
11
सेहवागनं लायकी काढली! पण शाकिबनं स्फोटक खेळी करताच रूबाब दाखवला, म्हणाला...
12
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
13
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
14
"त्यानं भारताविरूद्ध जे केलं ते...", नसीम शाहच्या समर्थनार्थ पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात!
15
'इंडस्ट्रीत एखाद्याच्या मागून....'; सिद्धार्थने सांगितली कलाविश्वातील खटकणारी गोष्ट
16
Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?
17
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
18
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
19
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
20
पदवीधरमधील विजय अपप्रचाराचे बारा वाजवेल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

आजपासून दहा दिवस प.पू.टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेले 'गंगाष्टक' स्तोत्र म्हणा आणि पावन व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 2:21 PM

हे स्तोत्र सलग दहा दिवस म्हणून आपणही गंगेची मानसपूजा करून हा उत्सव साजरा करूया. 

ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत दरवर्षी गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीत गंगा नदीला परम पवित्र मानले जाते. तीच गंगा जी महाविष्णूंच्या पदकमलातून निघते आणि तिच्यात स्नान करणाऱ्याला भगवान विष्णूंच्या पायाजवळ घेऊन जाते, तिचा हा दहा दिवसांचा उत्सव.

आपल्या हातून दरदिवशी घडणाऱ्या पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी आपण गंगास्नान करतो. ते शक्य नसेल, तर रोजच्या आंघोळीच्या वेळी 'गंगेच यमुनेचैव' हा श्लोक म्हणून पंचनद्यांनी स्नान केल्याचे पुण्य कमावतो. या दहा दिवसांतही आपण गंगा नदीचे स्मरण, मनोभावे पूजन करून आपले पापक्षालन व्हावे अशी प्रार्थना करूया.

गंगा मातेला शरण जाण्यासाठी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी म्हणजे प.पू.टेंबे स्वामी महाराजांनी प्राकृत मराठी भाषेत "गंगाष्टक" लिहिले आहे. हे स्तोत्र सलग दहा दिवस म्हणून आपणही गंगेची मानसपूजा करून हा उत्सव साजरा करूया. 

।। श्री गंगाष्टकम् ।।

न जाणे मी धर्मा न च विहित कर्मा अवगमा ।न जाणे मी शर्मा न च विहित आधार महिमा ।।कुकर्मासी कामा कुलित कृतकर्माची सुभगे ।मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। १।।

न केव्हाही येथे सुकृतलव संपादित असे ।न पूर्वीचे काही सुकृत पदरी भासत असे ।।पुढेही श्रेयाची गति न च दिसे खास मज गे ।मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। २।।

न साधूच्या संगा क्षणभरि धरी भक्ति न करी ।सुतीर्था क्षेत्राची पदवि बरवी ती हि न धरी ।।न देवाचे द्वारी क्षणभरि ठरे देवी सुभगे ।मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ३।।

न केले बैसोनी क्षणभरि पुराण श्रवणही ।कुकर्माच्या गोष्टी करूनि वय नेले सकलही ।।कदा काळी नेणे हरिभजन तेंहि न सुभगे ।मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ४।।

असा हां मी पापी शरण तुज आलो हरिसुते ।तुं या वारी पापा शमवि मम तापा सुरसुते ।।तुवां हाती घेता मग मजसी काहीच न लगे ।मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ५।।

महापापी तुझ्या अमृतजलपानेंचि तरले ।सुकृत स्नाने गेले उपरि न च तेही उतरले ।।असे मी ऐकोनी अयि शरण आलोचि तुज गे ।मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ६।।

त्रितापघ्नी ऐसे निज बिरुद तूं पाळी सदये ।त्रितापघ्नी ऐसे यशहि तव सांभाळी सुनये ।।अये योगिध्येयें निगमगणगेये श्रितभगे ।मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ७।।

महापापी नेले अससी जरी उद्धारुनी परे ।तयाहूनी श्रेष्ठा अजि मग आई उद्धरि बरे ।।तरीच प्रख्याती करिशी जगतीमाजि सुभगे ।मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।। ८ ।।